ठाकरे सरकारने कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण वाचवले पाहिजे- देवेंद्र फडणवीस

मुंबई | राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत गंभीरतेने विचार केला पाहिजे. मराठा आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय झाला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षण वाचवले पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण हा राजकारणापलिकडचा विषय आहे. आम्ही ज्यावेळेस मराठा आरक्षणाचे बिल आणले त्यानंतर केस झाली.

आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना एकत्रित करुन, सर्वांना माहिती देऊन आणि सर्वांची मदत घेऊन मराठा आरक्षणासाठी कामे केली. असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

सध्या मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात केस सुरु आहे. ही केस आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. या केसकडे सरकारचे लक्ष असणे गरजेचे आहे.

मात्र, राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.