कोरोनाला रोखण्यासाठी ठाकरे सरकार सज्ज! आता आवाजाच्या सहाय्याने होणार कोरोना टेस्ट

मुंबई | देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव हा महाराष्ट्रात दिसून आला आहे.

त्यामुळे, कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक उपाययोजना करत आहे. आता तर ठाकरे सरकार कोरोना टेस्टिंगसाठी एका नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. यामुळे केवळ आवाजाच्या सहाय्याने कोरोना तपासणी होणार आहे.

यासंदर्भातील माहिती स्वतः आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे. त्यांनी असे सांगितले की, बीएमसी आवाजाच्या नमून्याचा वापर करून AI-आधारित कोविड टेस्टिंगचे एक परीक्षण करेल. RT-PCR टेस्टिंगदेखील होत राहील.

राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी सरकार सातत्याने नवनवीन पाऊले उचलताना दिसत आहे. यामध्येच आता आवाजाच्या मदतीने कोरोनाची तपासणी होणे, हे देखील एक वेगळे पाऊल आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.