स्थानिक स्वराज्य संघटनेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द; ठाकरे सरकारला मोठा झटका

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर ठाकरे सरकारवर विरोधी पक्षाकडून टिका केली जात आहे. सध्या कोंडीत सापडलेल्या ठाकरे सरकारला आता आणखी एक मोठा झटका बसला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे.

ठाकरे सरकारने या संदर्भात पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, मात्र ही याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणारे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ठारके सरकारसाठी एक मोठा झटका आहे.

तसेच ओबीसींना २७ टक्क्यांच्यावर आरक्षण देऊ नका. २७ टक्कांच्या आरक्षणावरच निवडणूका घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशाला ठाकरे सरकारने आव्हान दिले, मात्र ठाकरे सरकारची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांवर असल्याप्रकरणी नागपुर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी आली होती. त्यावेळच्या फडणवीस सरकारने नागपुरसोबतच अकोला, वाशिम नंदुरबार आणि धुळे जिल्हा परिषदांना मुदतवाढ दिली होती. मुदत वाढल्याने सदस्यत्व रद्द करता येत असल्याने सरकारच्या आदेशाला न्यायलयात आव्हान देण्यात आले.

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा आदेश अयोग्य ठरवत सहा महिन्यांच्या आत निवडणूका घेण्याचे आदेश दिले. त्यावेळी सरकारने ओबीसींच्या लोकसंख्येच्या आधारे जागा निश्चित करण्याचा धनादेश काढला. पण ओबीसींच्या लोकसंख्येचा आकडा नसल्याने जागा निश्चित करता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयात म्हटले.

दरम्यान, सत्ता परिवर्तन झाल्यामुळे ठाकरे सरकार आले. ठाकरे सरकारने निवडणूका घेण्यास परवानगी देण्याची विनंती केली, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आणि पाच जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या निवडणूका झाल्या. आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर २७ टक्केच जागा निश्चित करायच्या आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या संकटात देश कोण चांगलं सांभाळू शकतं नरेंद्र मोदी कि राहूल गांधी ? जनता म्हणाली…
करिअर वाचवण्यासाठी स्वत: च्याच चित्रपटाचे तिकीट खरेदी करत होता ‘हा’ अभिनेता
निलेश लंकेंच्या कामाचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले कौतुक, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.