ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! संचारबंदीत ‘या’ दोन सेवाही अत्यावश्यक सेवेत

 

 

राज्यात कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. त्यामुळे राज्य सरकराने राज्यात काही कडक निर्बंध लावले होते. त्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवस संचारबंदी असणार अशी घोषणा केली होती.

बुधवारपासून लागलेल्या या संचारबंदीची नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील असे, उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

राज्यात लावलेल्या निर्बंधानुसार फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहे. तर बाकीच्या सर्व हालचालींवर मर्यादा आणण्यात आल्या आहे. आता मात्र राज्य सरकारने अत्यावश्यक सेवांच्या यादीत आणखी दोन विभागांचा समावेश केला आहे.

शासनाने आता एक नवा आदेश जाहीर केला आहे. त्यानुसार, वनविभागातील कामे आणि विमान वाहतूक संबंधित कामांना प्रवासासाठी आणि कामासाठी सवलत देण्यात आली असून या दोन विभागांचा अत्याश्यक सेवेत समावेश करण्यात आलेला आहे.

वनविभागाशी संबंधित सर्व व्यवसायांना मुभा देण्यात आली आहे. तसेच विमान सेवेच्या अंतर्गत येणाऱ्या सेवा म्हणजेच विमानतळ देखभाल, केटरिंग, कुरियर, सुरक्षा ही सुविधा देणाऱ्या लोकांनाही प्रवासासाठी सुट देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात या दोन विभागांना अत्यावश्यक सेवेत न टाकल्यामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे आता राज्य सरकारच्यावतीने आपत्कालीन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी अत्यावश्यक सेवांची ही यादी जाहीर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बिनधास्त करीना! सांगीतले चक्क बेडरूममधील ‘ते’ रहस्य, म्हणाली झोपताना मला..

चाहत्यासांठी खुशखबर! तारक मेहतामधील ‘दयाबेन’ आता पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

घृणास्पद! ढाब्यात थुंकून बनवली जात होती रोटी, पोलिसांनी कुक आणि मालकाला केली अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.