खाजगी रुग्णालयांची लूटमार रोखण्यास ठाकरे सरकार अपयशी- देवेंद्र फडणवीस

 

मुंवाई | राज्यात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात कोरोनाचे संकट वाढतच चालल्याने विरोधी पक्षाकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केल्या जात आहे.

आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकार खाजगी रुग्णालयांच्या लुटमारीला आळा घालण्यास अपयशी ठरल्याचे, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्यातील खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांकडून वाट्टेल तशी बिलांची आकारणी होत आहे. तसेच खुलेआम सुरु असलेली ही लूटमार रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावा विधिमंडळातील विरोधी पक्षाने केला आहे.

तसेच यावेळी रुग्णांची लूटमार रोखण्यासाठी कागदी घोडे नाचविणाऱ्या आरोग्य विभागाची चौकशी करावी, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, जवळपास पाच महिन्यापासून खाजगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकडून लाखांनी उपचाराची बिले वसूल केली जात आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.