मोठी बातमी! ठाकरे सरकारने केला चक्रीवादळाचा कायमचा बंदोबस्त, कोकणाला दिले ३ हजार कोटींचे पॅकेज

निसर्गवादळ, तौक्ते वादळ, तसेच गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण भागातील शेतकऱ्यांचे आणि सामान्य माणसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये अनेकांचे प्राणही केले आहे, त्यामुळे आता याबाबत ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

ठाकरे सरकारने आता चक्रीवादळाचा कायमचा बंदोबस्त केला आहे. तसेच कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी ३ हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. या निधीच्या मदतीने पालघर, ठाणे, सिंधूदूर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पुरस्थितींचा सामना करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येणार आहे.

राज्यात यावर्षी नैसर्गित आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. वादळ असो अतिवृष्टी या गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे आणि सामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात दरडही, महापुरही आला होता, त्यामध्ये अनेकांचे जीव गेले होते.

वादळामुळे शेतकऱ्यांसोबतच वापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले होते. तर अतिवृष्टीमुळे कोकणातील लोकांच्या घरातही पाणी शिरले होते. त्यामुळे हजारो नागरीकांना स्थलांतरीत व्हावे लागले होते. याच गोष्टीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कोकणातील जिल्ह्यामध्ये नैर्गिक आपत्तींशी सामना करता यावा, तसेच आपत्तींचा कायमस्वरुपी बंदोबस्त व्हावा यासाठी राज्य सरकारने तीन हजार कोटी रुपयांचा निघी कोकणाला दिला आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधूदूर्ग या जिल्ह्यांमध्ये तीन हजार कोटी रुपयांतून वेगवेगळी कामे केली जाणार आहे. प्रतिबंधक बंधारा, शेल्टर हाऊस, अंडर ग्राऊंड केबलिंग ही कामे केली जाणार आहे.

तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारने एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्यात आले आहे., अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. आरक्षणासाठी ५० टक्क्यांनी मर्यादा ठेवली आहे. तसेच ९० टक्के ओबीसींच्या जागा वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही भुजबळांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

पोलीस नव्हे देवता! पोलीसाने भाजीविक्रेत्यासोबत जे केले ते पाहून तुम्हीही हेच म्हणाल
“जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू हिंदूच” ‘त्या’ वादावर जावेद अख्तर यांची पहिली प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे हे ममता बॅनर्जी आणि एम के स्टॅलीन इकतेच लोकप्रिय, जावेद अख्तरांकडून कौतुकाचा वर्षाव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.