..तर मला ८५ व्या वर्षी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करावे लागेल; अण्णा हजारे पुन्हा मैदानात

अहमदनगर । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे पुढे येत आहेत. वाढत्या भ्रष्टाचारामुळे सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. यामुळे आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

केंद्र व राज्य सरकार भ्रष्टाचार थांबवण्यासाठी काही करत नाही. यामुळे आता राज्यात सक्षम लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकार काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय लोकपाल, लोकायुक्त कायद्यातील तरतुदीनुसार,केंद्रात लोकपाल कायदा लागू झाल्यापासून एक वर्षांच्या आत देशातील सर्व राज्यांनी लोकपालच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा करणे बंधनकारक आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप लोकपालच्या धर्तीवर लोकायुक्त कायदा झाला नाही.

त्यासाठी ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१९ असे ७ दिवसांचे उपोषण केले. त्यावेळी उद्धव ठाकरे अजित पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र अजूनही यावर निर्णय घेतला गेला नाही. यामुळे आता पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल.

यासाठी मसुदा समिती नेमली. यासाठी आजपर्यंत ६ बैठका झाल्या. मात्र कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बैठक झालेली नाही, असे हजारे यांनी म्हटले आहे. यामुळे यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा.

अण्णा हजारे यांनी जर आंदोलन केले तर पुन्हा सगळीकडे वातावरण तापणार आहे. यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत अण्णा हजारे यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.