ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची मदत जाहीर

मुंबई । कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अनेक नद्यांना पूर आले असून दरडी कोसळून अनेकांचे मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर लवकरच लवकर मदत जाहीर करण्याची मागणी नागरिकांसह विरोधी पक्षांनी केली होती. यामुळे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने पूरग्रस्त भागासाठी पॅकेजची घोषणा केली आहे. राज्य सरकारने ११ हजार ५०० कोटीच्या पॅकेजला मंजुरी केली आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.

या पावसाने कोकणात रायगड, महाड, चिपळूण या शहरात मोठे नुकसान केले. सगळे शहर पाण्याखाली गेले होते. अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. तर काहींचा यामध्ये मृत्यू देखील झाला आहे. शेतीचे, घराचे मोठे नुकसान झाले आहे.

याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी केली. यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपण लवकरच मदत देणार असल्याचे सांगितले होते. यामुळे आता मदत जाहीर करण्यात आली आहे.

याचा फायदा आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील होणार आहे. पूर आल्यानंतर लगेच १० हजारांची तातडीने मदत देखील जाहीर करण्यात आली होती. आता ही मदत लवकरच नियमांप्रमाणे दिली जाणार आहे. केंद्र सरकारने देखील ७०० कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

ताज्या बातम्या

काय सांगता! सहावे लग्न करणाऱ्या माजी मंत्र्याचा भांडाफोड, असे आले प्रकरण समोर, जाणून घ्या…

शरीरसंबंधासाठी नवऱ्याला उठवताना धपकन पडली महिला, पुढे घडला हा भलताच प्रकार

१५ वर्षाची मुलगी कारमध्ये करत होती सेक्स; पुढे घडला हा भयानक प्रकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.