IND Vs ENG : विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयावर गावस्करांचे प्रश्नचिन्ह

चेन्नईमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड असा दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला आराम दिला गेला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या या निर्णयावर माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी सवाल उपस्थित केला आहे.

सुनिल गावस्कर यांच्या मते वर्कलोडच्या नावाखाली आपल्या नंबर एक वेगवान गोलंदाजाला आराम देऊ शकत नाही. जसप्रीत बुमराह नव्या चेंडूने गोलंदाजी करणारा भारताचा नंबर एक गोलंगाज आहे. सुनिल गावस्कर यांनी संघ व्यवस्थापनावर आणि कर्णधार विराट कोहलीच्या बुमराहाला आराम देण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सुनिल गावस्कर म्हणाले या कसोटी मालिकेतील पहिलाच सामाना भारतीय संघाने गमावला आहे. यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात तुम्ही तुमचा नंबर एक असलेल्या गोलंदाजाला आराम कसा काय देऊ शकता. तसेच माजी सलामी फलंदाजाने हा निर्णयाला आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, सामन्यापुर्वी विराट कोहली याने जसप्रीत बुमराह याला वर्कलोडमुळे आराम दिल्याचे म्हटले होते. दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल केले गेले आहेत. यामध्ये शाहबाज नदीम, जसप्रीत बुमराह आणि वॉशिंगटन सुंदर यांच्या जागेवर कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांना संघात स्थान मिळाले आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.