विराट आणि अजिंक्यमध्ये कर्णधारपदासाठी टक्कर? अजिंक्यने दिलेले उत्तर वाचून कौतुक कराल  

मुंबई | ऑस्ट्रेलियावर भारत क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. चारीमुंड्या चीत करत कसोटी मालिका २-१ च्या फरकाने भारताने त्यांच्याच घरात जिंकली. ही सर्व कामगिरी मराठमोळा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पार पडली. यानंतर क्रिकेटविश्वात चर्चांना उधान आले.  अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील या दमदार विजयामुळे त्याच्याकडेच कसोटीचे पुर्णवेळ कर्णधारपद सोपविण्यात यावे या मागणीने जोर धरला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी खूपच खराब होती. त्यानंतर कोहली काही कारणाने मायदेशी परतला होता. दुसऱ्या सामन्यापासून अजिंक्यकडे कर्णधारपद आले. त्यानंतर भारतीय संघाने विजयाचा धडाका लावला.

चौथ्या सामन्यातील विजयानंतर अजिंक्यच्या नेतृत्वात भारताने बॉर्डर गावस्कर कोसोटी मालिका जिंकली. यानंतर पूर्णवेळ कसोटी कर्णधारपद अजिंक्याकडे देण्याबाबत चर्चा होऊ लागली होती. आता अजिंक्याने त्यावर प्रतिक्रिया देत सर्व प्रश्नांना आणि चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

याबाबत बोलताना अजिंक्य म्हणाला, ‘कर्णधार पदावरुन माझ्यात आणि विराटमध्ये कोणतीही टक्कर नाही. भारतीय संघाची धुरा जेव्हा विराट संभाळतो तेव्हा आपल्या संघाला विजय मिळून देणे, हाच हेतू असतो. जेव्हा मी कर्णधार होतो, तेव्हा विराट कोहलीने कर्णधार म्हणून जे केले असते तेच मी केले’.

महत्त्वाच्या बातम्या-
घासून नाही रे ठासून! संकट आली पण हरले नाही, भारताने ‘असा’ खेचला रोमांचक विजय
‘आला रे आला अजिंक्य आला’, रहाणेचे जंगी स्वागत; कडेवर लेकीला घेऊनच स्वागताचा केला स्वीकार
अजिंक्यच्या नेतृत्वाखाली मेलबर्नमध्ये भारताचा विजय, यावर मायदेशी परतलेला कोहली म्हणतो….
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात लोळवल्यानंतर ड्रेसिंग रूममधून समोर आला पहिला व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.