Share

Tesla Y Model Car price India : टेस्ला कारची भारतात एंट्री; 5 सेकंदात 100 चा टॉप स्पीड, जाणून घ्या मॉडेल्स आणि किंमत ?

Tesla Y Model Car price India: जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या टेस्ला (Tesla) कंपनीने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक SUV Model Y अधिकृतपणे लाँच केली आहे. यानिमित्ताने मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुलात (BKC) कंपनीने आपले पहिले टेस्ला एक्स्पेरियन्स सेंटर सुरु केले आहे. या केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले.

किंमतीचा तपशील:

भारतासाठी सादर करण्यात आलेल्या Model Y च्या दोन व्हर्जनची किंमत जाहीर करण्यात आली आहे:

  • स्टँडर्ड RWD व्हर्जन – ₹61.07 लाख

  • Long Range RWD व्हर्जन (LR RWD) – ₹69.15 लाख
    (या किंमती ऑन-रोड आहेत)

बुकिंगसाठी ₹22,000 इतकी रक्कम द्यावी लागते, ही नॉन-रिफंडेबल आहे. डिलिव्हरी 2025 च्या तिसऱ्या तिमाहीपासून (Q3) सुरू होणार आहे. सध्या ही कार मुंबई (Mumbai), दिल्ली (Delhi) आणि गुरुग्राम (Gurugram) येथे उपलब्ध आहे.

कारची तांत्रिक वैशिष्ट्ये:

  • Model Y RWD : 0 ते 100 किमी प्रतितास वेग फक्त 5.6 सेकंदात

  • LR RWD रेंज : 622 किमी (75kWh NMC बॅटरी)

  • स्टँडर्ड RWD रेंज : 500 किमी (60kWh LFP बॅटरी)

  • मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक अ‍ॅडजस्टमेंट फंक्शन्स

  • नवीन डिझाईनमध्ये बाह्य व आतील बदल

स्पर्धात्मक मॉडेल्स:

भारतामध्ये Model Y ची थेट स्पर्धा पुढील लक्झरी इलेक्ट्रिक SUV मॉडेल्ससोबत होणार आहे:
बीएमडब्ल्यू X1 LWB (BMW X1 LWB), व्होल्वो C40 (Volvo C40), BYD Sealion 7, आणि मर्सिडीज-बेंझ EQA (Mercedes-Benz EQA)

Model Y ही टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी कार असून, ती जगभरातही सर्वाधिक खरेदी केली जाणाऱ्या कार्सपैकी एक आहे. भारतात ही गाडी पूर्णपणे आयात (CBU) करून आणली जात असल्याने किंमत तुलनेने जास्त आहे.

रंगासाठी अतिरिक्त शुल्क:

आपल्या आवडीनुसार रंग निवडताना पुढीलप्रमाणे अतिरिक्त रक्कम भरावी लागेल:

  • पर्ल व्हाइट मल्टी-कोट – ₹95,000

  • डायमंड ब्लॅक – ₹95,000

  • ग्लेशियर ब्लू – ₹1,25,000

  • क्विक सिल्व्हर – ₹1,85,000

  • अल्ट्रा रेड – ₹1,85,000

  • स्टेल्थ ग्रे – मूलभूत रंग, अतिरिक्त शुल्क नाही

टेस्ला Model Y हे भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारासाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरू शकते. वेग, रेंज, डिझाईन आणि तंत्रज्ञान यांच्या बळावर ही कार प्रीमियम ईव्ही खरेदीदारांसाठी आकर्षक पर्याय बनली आहे.

ताज्या बातम्या Featured

Join WhatsApp

Join Now