VIDEO: आपल्या आई वडिलांचा विचार कर आणि.., भारतीय जवानांनी समजवल्यानंतर दहशतवाद्याने केले सरेंडर

दहशतवाद्यांना आता शस्त्र टाकून सरेंडर करण्यास भारतीय जवान भाग पाडत आहे. आता अशीच एक घटना शुक्रवारी काश्मिरच्या शोपियान जिल्ह्यातील हंजीपोरा गावात घडली आहे. या घटनेत एका दहशतवाद्याने भारतीय जवानांपुढे सरेंडर केले आहे.

या सर्व घटनेचा व्हिडिओ जवानांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल होता. पण त्याचा साथीदार लपुन बसला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी जवानांनी भावून संदेश देत त्याला सरेंडर करण्यास भाग पाडले आहे.

तुझ्या साथीदारासारखं तुला काही झालं तर तुझ्या कुटुंबाचे काय होईल, असे लपुन बसलेल्या दहशतवाद्याला जवानांनी म्हटले. त्यानंतर दहशतवाद्याने रायफल एके ५६ सोबत स्वत:ला सरेंडर केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोएबाच्या दहशतवाद्यांबद्दल जवानांना माहिती मिळाली आहे. त्यानंतर भारतीय जवानांनी एक शोध मोहिम सुरु केली आहे. त्याच शोध मोहीम दरम्यानचा हा एक व्हिडिओ आहे.

जवानांनी या ठिकाणी दहशवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्याठिकाणी जवान पोहचताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याचा मृत्यु झाला. पण एक दहशतवादी अजूनही लपलेला होता.

त्यामुळे लपुन बसलेल्या दहशतवाद्याला सरेंडर करण्यास सांगितले. स्वत:च्या घराबद्दल विचार कर. तुझ्यामित्रासोबत काय झाले विचार कर. तुझ्यानंतर तुझ्या कुटुंबाचे काय होईल, अशा भावूक भावनांचा आधार देत जवानांनी त्या दहशतवाद्याला सरेंडर करण्यास भाग पाडले आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुरेश रैनाने बॉलीवूडपेक्षा साऊथ अभिनेत्यांवर दाखवला जास्त विश्वास, बायोपिकसाठी सुचवली ही नावं
लग्नाच्या पहिल्याच रात्री असे काय झाले की, नववधूला जेलमध्ये जावे लागले?, जाणून घ्या…
भल्याभल्यांना नडणाऱ्या कंगणाबाबत ‘बजरंगी भाईजान’च्या ‘मुन्नी’ने केली ‘ही’ गोष्ट; पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.