पुण्यात एकादिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत भयानक वाढ; चार महिन्यांचा विक्रम तोडला

 

पुणे। राज्यात कोरोनाने थैमान घातला आहे. अशात पुण्यात देखील गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. पुण्यात काल एका दिवसात कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत धक्कादायक वाढ झाली आहे.

पुण्यात काल एका दिवसात तब्बल १,२५१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर २५ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. एका दिवसात एवढे रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे.

त्यामुळे पुण्यातील धोका आणखी वाढू लागल्याचे स्पष्ट होत आहे. अशात एक दिलासादायक बाब म्हणजे पुण्यात काल एका दिवसात ५८९ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

एकूण ३४७ रुग्णांनाची प्रकृती सध्या गंभीर आहे. तर पुण्यात काल ४ हजार ६८ रुग्णांची चाचणी केली गेली. आतापर्यंतची चाचण्यांची संख्या १ लाख २० हजार ५८ इतकी झाली आहे.

एकट्या पुण्यात काल ८६० जणांना कोरोनाची लागण झाली असून पिंपरी चिंचवड मध्ये २८२ व पुणे ग्रामीणमध्ये ६४ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच पुणे कँटोन्मेंटसह नगरपालिका हद्दीत ४५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

त्यामुळे पुणे शहरातील रुग्णसंख्या १८ हजार १५६ तर जिल्ह्याची रुग्णसंख्या २३ हजार ६८० एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत पुण्यात ७८८ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.