गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या इको कारला भीषण अपघात; १० जण गंभीर जखमी

पालघर। मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हालोली गावच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजताच्या सुमारास कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या इको कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून दहा जण देखील जखमी झाले आहेत.

विशेष म्हणजे या जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. खरंतर कोकण वाशियांसाठी गणेशउत्सव हा महत्वाचा आणि उत्साही सण आहे. शहरातील सगळेच चाकरमानी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात कोकणात जात असतात.

काहीजण तर बाप्पाच्या आगमनाच्या चार ते पाच दिवस आधीच कोकणात जातात. असेच काही गणेश भक्त हे कोकणात जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून सर्वाना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

मात्र या दहा जणांमध्ये कार चालक गंभीर जखमी आहे. शुक्रवारी सुरू होणारी गणेशोत्सवासाठी सुरत वरून रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील देवघरकडे जाणाऱ्या दहा प्रवाश्यांना घेऊन इको कार(GJ05RK2492)निघाली होती. या कारमध्ये दहा प्रवासी होते.

हालोली गावच्या हद्दीत ओमकार धाब्यावर समोर आल्यानंतर भरधाव वेगातील कार चालकाला झोप लागली, त्यामुळे चालकाचे कार वरील नियंत्रण सुटून अपघात झाला. अपघातानंतर लगेच या सर्वाना जवळील दवाखान्यात घेऊन जाण्यात आले.

कार मधून चार महिला चार पुरुष दोन लहान मुले असे प्रवास करत होते. अपघातानंतर आता सर्वांवर उपचार सुरु असून चालक मात्र गंभीर जखमी आहे. राजेंद्र सुतार असं या कार चालकाचे नाव आहे.
महत्वाच्या बातम्या
बॉलीवूड दुःखात! अक्षय कुमारच्या आईच्या निधनानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या आईचेही निधन 
पित्याने जुळ्या पोरांसह मृत्यूला कवटाळले, पत्नीनेही दीड महिन्यापूर्वीच गळ्याला फास आवळले.. 
अनिल अंबानींना आले चांगले दिवस; दिल्ली मेट्रोविरोधात असलेली केस जिंकली, आता मिळणार ४६ अब्ज रुपये 
काय सांगता! या मातब्बर कार कंपनीने ठोकला भारताला राम राम, तोट्यात जात होत्या या कंपनीच्या गाड्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.