Share

Pune Accident News : तीन तासांत एकाच ठिकाणी दहा अपघात! प्रशासनाच्या मलमपट्टीनं पुणेकरांचे जीव टांगणीला; घटना सीसीटीव्हीत कैद

Pune Accident News :  पुणे (Pune) जिल्ह्यात मावळ तालुक्यातल्या देहू ते येलवाडी मार्गावर सोमवारी सकाळी जे काही घडलं, त्यानं प्रत्येक पुणेकराचा जीव घशात आणला. फक्त तीन तासात, एकाच जागी तब्बल दहा अपघात घडले. रस्त्यावरून जात असलेले दुचाकीस्वार एकामागोमाग एक घसरत पडले. रस्त्यावर रक्त, ओरडणारे लोक, उचलायला धावणारे जणू एखादं युद्ध सुरूच… आणि हे सगळं फक्त प्रशासनाच्या अर्धवट मलमपट्टीमुळे.

दहा अपघातांची मालिका

या रस्त्यावर आधीच मोठाले खड्डे होते. लोकांनी प्रशासनाकडे विनंती केली की रस्ता नीट करा, खड्डे बुजवा. पण प्रशासनानं काय केलं? खड्ड्यांमध्ये मुरुम भरून मलमपट्टी केली. आणि पावसात हाच मुरुम माखून रस्ता चिखलात बदलला. नंतर जे झालं ते सगळं सीसीटीव्हीत कैद झालं – एकानंतर एक बाईकस्वार घसरत पडताना दिसतायत, काही जण गंभीर जखमी झालेत.

“प्रशासन झोपलंय का काय?”

स्थानिक नागरिक अक्षरशः संतापलेत. प्रशासनाचं हे अर्धवट काम कोणा तरी निरपराधाच्या जीवावर बेतू शकतं, अशी भीती व्यक्त केली. “दहा अपघात पाहूनसुद्धा काही हलत नाही प्रशासनाला, मग एखाद्याचा जीव गेला तरच त्यांना जाग येणार का?” असं स्थानिकांनी थेट विचारलंय.

मार्गावरही गोंधळ

मुंबई (Mumbai) शहरात सकाळपासूनच पावसाचं रौद्र रूप दिसतंय. त्यामुळं पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवली ते वांद्रे दरम्यान जवळपास दीड ते दोन तासांची वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सांताक्रुज, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी या भागांत वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. वाहतूक पोलिसांची टीम युद्धपातळीवर काम करत असली तरी पावसामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे.

याच दरम्यान पुण्यात एक भयानक घटना घडली. जांभुळकर चौक परिसरात विंग कमांडर वीरेंद्र कुमार जिंदाल (Wing Commander Virendra Kumar Jindal) यांच्या घरात पहाटे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्ती घुसून थेट बेडरूममध्ये शिरले. त्यांनी कपाट उघडून ४० तोळे सोनं आणि ८.५ लाख रुपये लंपास केले. त्यानंतर ते फरार झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now