मंदिर निर्माण होतंय, पण हॉस्पिटलमध्ये बेड मागू नका; स्वरा भास्करची मोदींवर जोरदार टीका

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने हाहाकार उडवला आहे. रुग्णसंख्या वाढल्याने अनेक रूग्ण उपचाराअभावी मृत्युमुखी पडत आहेत. अनेकांना बेड, ऑक्सिजन देखील मिळत नाही. यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे.

असे असताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तिने आतापर्यंत केंद्र सरकारविरोधातील अनेक आंदोलनात भाग घेतला आहे. आताही तिने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये पंतप्रधानांचा एक फोटो शेअर करून त्यांच्यावर टीका केली आहे.

त्या फोटोखाली लिहिले आहे की, मंदिर त्याच ठिकाणी निर्माण होत आहे, पण हॉस्पिटलमध्ये बेड मागून लज्जीत करू नका, धन्यवाद, असे तिने म्हटले आहे. यामुळे आता ती चर्चेत आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री देशवासियांना संबोधित केले. देशात अनेक राज्यांनी निर्बंध कडक केले आहे, तर काही राज्यांनी वीकेंड लॉकडाऊन लागू केले आहे. अनेक राज्यात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले की, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असायला हवा. लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ नये. कोरोना संकटात नागरिकांचे जीव वाचले पाहिजेत. मात्र देशाचे अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे.

तरुणांना या संकटाना पुढे येऊन मदत केली पाहिजे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे लॉकडाऊन देखील होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

टिक टॉक स्टार १४ वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार, विडिओ व्हायरल करण्याची देत होता धमकी

सलमानभाई माझे सगळे आयुष्य तुला मिळावे, ढसाढसा रडत असे का म्हणाली राखी? जाणून घ्या..

कंगनाने शेअर केला नैवेद्याच्या ताटाचा फोटो, ताटातील कांदा पाहून लोकांनी झापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.