टेलिव्हिजनवरील कलाकारांचे घर फक्त अभिनयाने चालत नाही; म्हणून करतात ‘हे’ काम

ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही कलाकाराचे करिअर जास्त काळ टिकून राहत नाही. एका वेळेनंतर कलाकारांचे करिअर संपते. म्हणूनच त्यांना अभिनयासोबत दुसरे काही तरी काम करणे गरजेचे असते. इंडस्ट्रीतील कलाकार अभिनयासोबतच बिजनेस देखील करणे पसंत करतात.

आयूष्यात पुढे जाऊन पैशांची कोणतीही अडचण येऊ नये म्हणून कलाकारांनी अभिनयासोबत साईड बिजनेस सुरु केले आहेत. असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे स्वत चे बिजनेस आहेत आणि ते त्या बिजनेसमध्ये खुप यशस्वी आहेत. जाणून घेऊया टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अशा कलाकारांपैकी जे यशस्वी बिजनेस देखील चालवतात.

१ दिव्यांका त्रिपाठी – टेलिव्हिजन क्वीन दिव्यांका त्रिपाठी इंडस्ट्रीतील सर्वात महाग अभिनेत्री आहे. यशस्वी अभिनेत्रीसोबतच दिव्यांका यशस्वी बिजनेस वुमन देखील आहे. तिची भोपालमध्ये डान्स अकॅडमी आहे. ज्यातून ती वर्षाला करोडो रुपये कमवत आहे.

२ शाहिर शेख – टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील हॅंडसम हंग शाहिर शेख त्याच्या अभिनयामूळे नेहमीच चर्चेत असतो. शाहिर भारतासोबतच इंडोनेशियामध्ये देखील खुप प्रसिद्ध आहे. म्हणून त्याने इंडोनेशियामध्ये प्रोडक्शन हाऊस सुरु केले आहे. या प्रोडक्शन हाऊसमधून त्याला खुप जास्त फायदा होतो.

३ अर्जून बिजलानी – टेलिव्हिजवरील सर्वात महागडा आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणून अर्जूनची ओळख आहे. एवढे यशस्वी करिअर असून देखील अर्जून बिजनेस करतात. अर्जूनची मुंबईत वाईन शॉप आहे. त्यासोबतच तो एका टिमचा को ओनर देखील आहे.

४ विजेंद्र कुमारिया – उडान मालिकेतून घराघरात ओळख मिळवलेला विजेंद्र इंडस्ट्रीतील प्रसिद्ध बनला आहे. पण तरीही त्याने बिजनेस करणे योग्य समजले. विजेंद्रचे प्रोडक्शन हाऊस आहे. दबंग टिव्हीवर येणाऱ्या मालिकांची निर्मीती विजेंद्र करतो. याच कारणामूळे त्याच्याकडे पैशांची काहीही कमी नाही.

५ करण कुंद्रा – करणला इंडस्ट्रीमध्ये किंग कुंद्रा नावाने ओळखले जाते. त्याचे जालिंधरमध्ये इंटरनॅशनल कॉल सेटंर आहे. त्यासोबतच तो वडीलांसोबत मिळून त्यांचा फॅमिली बिजनेस देखील सांभाळतो. त्याच्याकडे पैशांची काहीही कमी नाही.

६ रॉनित रॉय – रोनित रॉय बॉलीवूड आणि टेलिव्हिजनवरीरल प्रसिद्ध चेहरा आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करुन त्याने अभिनयात नाव कमवले आहे. त्यासोबतच त्याची एजन्सी देखील आहे. ज्यातून तो इंडस्ट्रीतील मोठ्या मोठ्या कलाकारांना संरक्षण देतो.

महत्वाच्या बातम्या –
अक्षय खन्ना आजही आहे अविवाहित, कारण आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या…
शाहरुख खानने जेव्हा प्रियांका चोप्राला लग्नासाठी मागणी घातली होती, तेव्हा तिने दिले होते हे उत्तर
शोले फेम गब्बरची मुलगी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा फोटो…
शाहरुख खानची मुलगी सुहानाने केले बिकीनी शुट; फोटो पाहून चाहत्यांना फुटला घाम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.