टीव्हीवरील सेलिब्रिटी रस्त्यावर विकतायेत भाजीपाला; त्यांच्यावर अशी वेळ का आली? वाचा..

सध्या राज्यात लॉकडाऊन चालू आहे. लॉकडाऊन चालू असल्यामुळे सगळेच बंद आहे. चित्रपट आणि दूरचित्रवाहिनीवरच्या मालिकांच्या शुटिंगवर पण बंदी घालण्यात आली आहे. मुंबईमध्ये अनेक मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग चालते.

लॉकडाऊन असल्यामुळे चित्रपटाच्या आणि मालिकांचे शूटिंग पण दुसऱ्या राज्यांमध्ये होऊ राहिले आहे. शूटिंग बंद पडल्यामुळे लहान मोठ्या कलाकारांवर पण उपासमारीची वेळ आल्याचे दिसून आले आहे.

काही मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग जरी बाहेर राज्यात चालू असले तरी पण सेटवरील बरेचसे काम करणारे लोक कमी करण्यात आले आहेत. शूटिंग करताना पण कमी लोकांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे सेट वर काम करणारे आणि इतर कलाकार पण बेरोजगार झाले आहेत.

आजतक वहिनीला कलाकारांनी मुलाखत दिली त्यात त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. भावना नावाची आर्टिस्ट सध्याच्या घडीला चौकीदाराचे काम शोधत आहे. ती गेल्या १५ वर्षांपासून ज्युनिअर आर्टिस्टचे काम पाहत आहे.

‘तिस मार खान’, ‘अग्निपथ’, ‘गजनी’, ‘स्लमडॉग करोडपती’ अशा अनेक 200 हून अधिक चित्रपटांत तिने काम केलं आहे. पण लॉकडाऊनमुळे तिच्यावर पण उपासमारीची वेळ आली आहे. आणखी काही कलाकारांनी पण हीच भूमिका मांडली आहे.

४५ वर्षाच्या अहमजदने पण उपासमारीची वेळ आल्याचे म्हटले आहे. रमजानच्या महिन्यात मित्रांच्या मदतीने फळे विकल्याचे त्याने म्हटले आहे. राहत्या घराचे पण भाडे भरायला नसल्याचे पण त्याने यावेळी म्हटले आहे.

ताज्या बातम्या
रियल सिंघमने उडवली दौंडमधील काळे धंदेवाल्यांची झोप! सर्व धंदे बंद करत केला साडेचार कोटींचा माल जप्त
टाटा ग्रुपने या कंपनीत केली १२०० कोटींची गुंतवणूक; ६५ टक्के असणार भागीदारी

चित्रपटांमध्ये रेप सीन केल्यामूळे खलनायकाच्या आई वडीलांनी त्याच्याशी तोडले होते सगळे नाते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.