२६ वर्षांपर्यंत क्रिकेटर ते उपमुख्यमंत्री जाणून घ्या तेजस्वी यादव यांचा आतापर्यंतचा प्रवास….

बिहार विधानसभा निवडणूकीचा निकाल आज लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निकालावर लागलेले आहे. मतदानाच्या काही दिवसांपूर्वी एकतर्फी वाटणारी निवडणूक आता मात्र अटीतटीची बनली आहे.

सलग १५ वर्षांपासून सत्तेवर असणारे नितीश कुमार सरकारविरोधात अँटी इन्कम्बन्सी, एकत्र येऊन निवडणूक लढवत असूनही भाजपा आणि जेडीयुमध्ये अविश्वास, एनडीए न सोडता चिराग पासवान यांनी मांडलेली वेगळी चूल यामुळे बिहार निवडणूकीचे वातावरणच बदलले आहे.

अशात लालू यांच्या अनुपस्थितीत आरजेडीच्या नेतृत्वाखाली महाआघाडीची धुरा एकहाती सांभाळणाऱ्या तेजस्वी यादव यांनी प्रचारात घेतलेली जोरदार आघाडी यामुळे निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

तसेच या निवडणुकीत आता नितीश कुमार आपली सत्ता राखणार की तेजस्वी यादव या बिहारचे मैदान मारणार अशा चर्चा असल्याने ही विधानसभा निवडणुक अटीतटीची बनली आहे. पण तुम्हाला महितीये का तेजस्वी यादव कोण आहे आणि त्यांची कारकीर्द काय आहे, तर जाणून घेऊ तेजस्वी यादव यांच्या कारकिर्दीबद्दल..

बिहारच्या राजकारणात दबदबा असणारे लालू यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव आहे. तेजस्वी यादव यांचा जन्म १० नोव्हेंबर १९८९ झाला होता. त्यांनी आपल्या करियर क्रिकेटमध्ये करायचे ठरवले त्यामुळे त्यांचे शिक्षण मागेच राहिले.

शिक्षणात तेजस्वी हे लालू यादव यांच्या खूप मागे आहे. लालू यादव यांनी वकिलीची शिक्षण घेतले आहे, तर क्रिकेटमध्ये करियर करायचे असल्यामुळे तेजस्वी यादव यांनी ९ वी पर्यंतच शिक्षण घेतले.

राजकारणात येण्याआधी ते क्रिकेटमध्ये आपले करियर होते. त्यामुळे तेजस्वी यादव २००८ ते २०१२ पर्यंत आयपीएल टीम दिल्ली डेअरडेविल्सचा भाग होते, मात्र त्यांना आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

लालू यादव यांनी याचा उल्लेख संसदेतदेखील केला होता, तेजस्वी यांना खेळण्याची संधी देण्याऐवजी त्यांना खेळाडूंना पाणी बॉटल देण्याचे काम सांगितले जात असल्याची तक्रार लालू यादव यांनी संसदेत केली होती.

तेजस्वी यादव यांना क्रिकेटमध्येच आपले करियर करायचे होते, मात्र लालू प्रसाद चारा घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेले, त्यामुळे तेजस्वी यांच्या राजकारणात येण्याच्या चर्चा सुरू झाल्या.

तेजस्वी यादव यांनी पहिल्यांदा २०१५ मध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या तिकिटावर राघोपुर मतदार संघातली आपली निवडणूक जिंकली. यानंतर ते नितीश कुमार सरकारमध्ये नोव्हेंबर २०१५ आणि जुलै २०१७ मध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री होते. तेजस्वी यादव हे वयाच्या २६ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते.

तसेच आता सर्वांचे लक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आहे. ही निवडणूक जिंकून जर तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनले तर ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.