Bihar Election Eesult 2025 : हरता हरता विजय! तेजस्वी यादवांनी राघोपूरची जागा कायम राखली, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव

Bihar Election Eesult 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सर्वांचे लक्ष ज्या निकालावर थांबले होते, तो म्हणजे राघोपूर मतदारसंघ. आरजेडीचे तरुण नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav Raghopur Leader) यांनी सुरुवातीला मिळालेल्या मोठ्या पिछाडीनंतर शेवटच्या टप्प्यात उलटफेर करीत दणदणीत विजय मिळवला. भाजप उमेदवार सतीश कुमार (Satish Kumar BJP Leader) यांना तब्बल 14 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

मतमोजणीच्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये परिस्थिती अत्यंत चुरशीची होती. कधी तेजस्वी पुढे तर कधी भाजप उमेदवार. मात्र अंतिम फेऱ्यांमध्ये जोरदार आघाडी घेत, तेजस्वी यादव यांनी सलग तिसऱ्यांदा राघोपूरचा किल्ला कायम ठेवला.

अंतिम मतसंख्या

  • तेजस्वी यादव – 1,18,597 मतं

  • सतीश कुमार – 1,04,065 मतं

यादव परिवाराचा एकजूट शक्तीप्रयोग

या वेळेस राघोपूरमध्ये स्पर्धा अधिक तीव्र होती. यादव समाजाच्या नाराजीच्या चर्चा सुरू असल्याने, संपूर्ण यादव परिवार प्रचारासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरला. माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri Devi RJD Leader), मीसा भारती (Misa Bharti RJD Leader) आणि रोहिणी आचार्य (Rohini Acharya RJD Leader) यांनी घरोघरी भेट देत, मतदानासाठी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क केला. या कुटुंबीय एकजुटीचा फायदा आरजेडीला निर्णायक ठरला.

लालू यादव परिवाराची राघोपूरमधील परंपरा कायम

राघोपूर हा मतदारसंघ लालू प्रसाद यादव (Lalu Prasad RJD Chief) यांच्या कुटुंबाची परंपरागत जागा मानली जाते.
या जागेवर-

  • लालू यादव यांनी 1995 व 2000 मध्ये विजय मिळवला

  • राबडी देवी यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केलं

  • तेजस्वी यादव यांनी 2015, 2020 आणि आता 2025 अशा तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवत परंपरा पुढे नेली

2010 मध्ये भाजपचे सतीश राय विजयी झाले होते, परंतु त्यानंतर पुन्हा लालू परिवाराचा दबदबा कायम राहिला आहे.

बिहारमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती

बिहारमध्ये एनडीएने घेतलेल्या मोठ्या विजयाची तुलना अनेक तज्ज्ञांनी थेट महाराष्ट्रातील मागील निवडणुकीशी केली आहे.
महाराष्ट्रात महायुतीला लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Scheme Maharashtra) यशाची गुरुकिल्ली ठरली होती. त्याच धर्तीवर बिहारमध्येही ‘लाडली बहीण’ योजना (Ladli Bahin Scheme Bihar) प्रभावी ठरल्याचं मानलं जात आहे.

याचा थेट फायदा एनडीएला मोठ्या प्रमाणात मिळाला आणि महागठबंधनला अपेक्षित संख्याबळ मिळण्यात अपयश आलं. आरजेडी – 24, काँग्रेस – 6 म्हणून विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक आकडा गाठता आला नाही.