कुणीही पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढणार नाही; तेजस्वी यादव यांचा RJD नेत्यांना इशारा

मुंबई | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बिहार विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने मोठी आघाडी घेतली आहे.

तसेच मतमोजणी सुरु होण्याआधी तेजस्वी यादव यांनी त्यांच्या घराबाहेर जमलेल्या नेत्यांना, मतमोजणी सुरू होण्यापूर्वी बोलावले आणि निवडणुकीचा निकाल काहीही आला, तरी कुणीही पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढणार नाही, असे निर्देश दिले आहेत.

याचबरोबर, ‘अनेक नेते कॅमेऱ्यासमोर पंतप्रधान मोदींविरोध बोलत आहेत, हे योग्य नाही. आता, अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर कारवाईही केली जाऊ शकते, असा इशाराही तेजस्वी यादव यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने मोठी आघाडी घेतली आहे. तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल अर्थात RJD आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनने पहिल्या तासाभरातच बहुमताचा आकडा गाठला आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांच्या JDU आणि भाजपच्या महायुतीनं शंभरी पार केली आहे. NDAला आतापर्यंत १११ जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान या निवडणुकीत नितीश कुमार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कारण नितीश यांचा JDU पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची शक्यता आहे. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता आहे. तर तेजस्वी यादव यांच्या RJD ला बिहारच्या जनतेनं डोक्यावर घेतल्याचं आतापर्यंतच्या कलानुसार पाहायला मिळत आहे.

RJDचे नेते तेजस्वी यादव यांना विजयाचा विश्वास आहे. दरम्यान, एक्झिट पोलच्या अदांजानुसार महाआघाडीची सत्ता आली तर तेजस्वी यादव बिहारचे आणि भारतातील एखाद्या राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरणार आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या
३१ वर्षाच्या तरुणाने देशातील भल्याभल्यांना आव्हान दिलंय; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
राज्यपालांनी फोन केला अर्णबला नातेवाईकांना भेटूद्या; गृहमंत्र्यांनी थेट सुनावले नाही जमणार
या लढाईत मराठी माणसांनी आमच्या मागे उभं राहावं; अक्षता नाईक यांचं भावनिक आवाहन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.