तेजस्वी यादव सरकार स्थापन करण्याच्या तयारीत; राजकीय भूकंप होणार?

मुंबई | बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्त्वाखाली महागठबंधनने एनडीएला तगडी लढत दिली. मात्र त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. महागठबंधनाला ११० जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएकडे बहुमत आहे.

तसेच निकालानंतरही राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि महागठबंधनचे प्रमुख नेते तेजस्वी यादव यांनी सर्व आमदारांना पुढील एक महिना पाटण्यातच थांबण्याची विनंती केली आहे. बिहारमध्ये सत्ता महागठबंनचीच येणार, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

निकालानंतर पहिल्यांदाच तेजस्वी यादव यांनी नवनियुक्त आमदारांसोबत बैठक घेत सर्वांचे अभिनंदन केले. तसेच पक्ष बैठकीत बोलताना तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे. तेजस्वी यादव यांनी यावेळी आरजेडीच्या सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघात न परतता पुढील एक महिना पाटण्यातच थांबण्याचा आदेश दिला आहे.

दरम्यान, तेजस्वी यादव यांना सरकार स्थापन करायचं असल्यास त्यांना असेच डावपेच खेळावे लागतील. सध्या महागठबंधनकडे ११० आमदार आहेत. सत्ता स्थापनेसाठी १२२ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.

याचबरोबर, २०१५ मध्ये राजद, जेडीयू आणि काँग्रेसच्या महागठबंधननं भाजप आणि मित्रपक्षांचा धुव्वा उडवला. मात्र २०१७ मध्ये नितीश कुमार यांनी महागठबंधनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपने त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर राज्यात जेडीयू आणि भाजपचे सरकार स्थापन झाले.

महत्त्वाच्या बातम्या
किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर संजय राऊत भडकले, म्हणाले…
‘हे’ गुन्हेगार अर्णव गोस्वामी यांना का पाठीशी घालत आहेत? नाईक यांच्या कुटुंबीयांचा सवाल
मुलगी जन्माला आली आणि नशीबच बदललं; थेट भारतीय टीममध्ये झाली निवड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.