Share

Uddhav Thackeray: आदित्य ठाकरेंची जागा घेणार तेजस ठाकरे; उद्धव ठाकरे खेळणार नवा डाव

Tejas Thackeray Aditya Thackeray

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray): एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांना सोबत घेऊन बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे दोन गट पडले आहेत. पक्षातील ही फूट भरून काढण्यासाठी दोन्ही गटातील नेते जोरदार तयारीला लागले आहेत. यासोबतच शिंदे गटात वेगवेगळ्या पक्षातून नेत्यांची इन्कमिंग सुरूच आहे. दुसरीकडे, शिवेसेनेचे नेते आदित्य ठाकरे पक्षबांधणीसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

याच पार्श्वभूमीवर न्यायालयात शिवसेना कोणाची या मुद्द्यावरून ठाकरे व शिंदे गटात कायदेशीर लढाईदेखील सुरु आहे. आता शिवसेनेला बळ देण्यासाठी आणखी एक ठाकरे राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नातू व उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हे राजकारणात एंट्री करणार आहे.

१५ ऑगस्टला षण्मुखानंद हॉलमध्ये कुटुंबियांच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत तेजस ठाकरेंचा राजकारणातील प्रवेशाचा शुभारंभ होणार आहे. तेजस ठाकरेंकडे युवा सेनेची जबाबदारी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच आदित्य ठाकरे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी जाणार असल्याची माहिती मिळत आहे. बाळसाहेबांच्या स्वभावाशी समरस असलेले तेजस ठाकरे यांना मैदानात उतरवल्यास शिवसेनेत नवे स्फुरण, नवे चैतन्य संचारेल, शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढेल, असे मत युवा सैनिकांकडून व्यक्त केले जात आहे.

तेजस ठाकरे हे वन्यजीव संवर्धनासाठी काम करतात. वाईल्डलाईफ हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. त्यांनी खेकडे, पाली आणि सापांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. ते अजूनपर्यंत राजकारणात सक्रिय नव्हते, परंतु चळवळीच्या माध्यमातून त्यांनी आपले काम केले आहे. त्यामुळे आता ते राजकारणात येतील का, अशी सर्वांना उत्सुकता लागली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ आल्या असल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यासाठी आपला पक्ष कसा मजबूत करता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बंडखोरांना पर्याय शोधण्याचे काम शिवसेनेकडून सुरु आहेत. त्यासाठी अनेक सभा, बैठका घेण्यात येत आहेत. यासोबतच अनेकांना शिवसेनेत आणण्याचे प्रयत्नही सुरु आहेत.

महत्वाच्या बातम्या
Ranveer Singh Nude Photoshoot: रणवीर सिंह पुन्हा एकदा होणार न्युड; ‘या’ प्रसिद्ध संस्थेने केली जाहीर विनंती
Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना कात्रीत पकडत थेट मर्मावरच बोटं ठेवलं; मुंबई महापालिकेच्या मुद्द्यावर…
Uddhav Thackrey: बाळासाहेंबाचा ‘दादा कोंडके’ मातोश्रीवर; उद्धवजींना पाठींबा द्यायला १४ दिवसांचा पायी प्रवास
Shivsena: शिवसेनेची ‘ती’ मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळत दिला मोठा धक्का, शिंदे गटाचा मार्ग झाला सोपा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now