आमदार लंकेंसोबत वादानंतर तहसिलदारांची बदली; आता सुरू झाला वाळूमाफीयांचा धुडगूस

पारनेर । गेल्या काही दिवसांपूर्वी पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आणि तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांच्यात मोठा वाद सुरू होता. यातच ज्योती देवरे यांच्या कामात अनियमितता असते, असे कारण देत त्यांची तडकाफडकी जळगाव येथे बदली करण्यात आली. याची मोठी चर्चा झाली होती.

आता तालुक्यात तहसीलदारचा तात्पुरता कार्यभार नायब तहसीलदारांकडे देण्यात आला आहे. असे असताना आता परिस्थिती बदलेल असे अनेकांना वाटत होते. मात्र तरीही पारनेर तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरुच आहे. अवैध वाळू व्यवसाय विरुद्ध तक्रार करूनही तक्रारीची दखल घेतली जात नाही. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

पारनेर तालुक्यात वाळू माफिया छुप्या पद्धतीने काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून वाळूतस्करी करत आहे. अवैध वाळू व्यवसायामुळे पारनेर तालुक्यातील अनेक रोड खराब झाले आहेत. याला आळा घातली पाहिजे, यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. असेही सांगितले जात आहे.

यामुळे अपघात देखील वाढले आहेत, यामध्ये काहींचा जीव देखील गेला आहे. यामुळे तरी वाळू माफियांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. मात्र कोणासाठी याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे विचारले जात आहे.

तसेच प्रशासकीय यंत्रणेकडून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून आवाज दाबला जात असल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी निवेदनात म्हटले आहे. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे आता तरी कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आणि ज्योती देवरे यांच्यात मोठा वाद झाला होता. लंके यांचा वाळूचा ट्रक देखील त्यांनी पकडला असल्याचे सांगितले जात होते. यामुळे त्याची चर्चा सगळीकडे झाली होती. यानंतर त्यांची बदली देखील झाली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.