लंकेचा चोरीचा वाळूचा ट्रक पकडणाऱ्या तहसिलदार देवरेंची अखेर बदली; निलेश लंकेंसोबत झालता वाद

अहमदनगर । गेल्या काही दिवसांपासून पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे आणि आमदार निलेश लंके यांच्यात वाद सुरू होते. असे असताना पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे याच्यावर अनेक आरोप केले गेले होते. आता लोकसेवकपदाचा गैरवापर केल्याचा आरोप असल्याने त्या चौकशीत दोषी ठरल्या आहेत.

यामुळे त्यांची आता तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. त्यांच्यावर वाळूमाफियांना परस्पर कारवाईमुक्त करणे, वाळू उपसा करणाऱ्यांचे ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी पोकलेन मशिन जप्त केल्यानंतर तडजोड करून परस्पर मुक्त करणे असे आरोप आहेत.

यामध्ये देवरे यांनी ५ कोटी ९४ लाख ९६ हजार ७२ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार राज्याच्या लोकायुक्तांकडे दाखल करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने ज्योती देवरे यांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करुन त्याचा अहवाल सादर केला आहे.

या अहवालात ज्योती देवरे यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे म्हटले आहे. देवरे यांनी कामात गंभीर स्वरुपाची अनियमितता केली. पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. यामुळे सगळ्यांचे याकडे लक्ष लागले होते.

चौकशीदरम्यान देवरे यांनी माध्यमांमध्ये भाष्य करुन शासनाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची जळगाव जिल्ह्यातील संगायो येथील तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.