तहसीलदारावर आली शेतमजूर म्हणून काम करण्याची वेळ; वाचा का आली ही वेळ..

मुंबई | एमपीएससी परीक्षेचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. गुरुवारी परिक्षेबाबत एक महत्वाची घोषणा झाली आणि दीड वर्षात परिक्षेची तारीख पाचव्यांदा पुढे ढकलली गेली. अशात एका तरुणाने पदाच्या नियुक्तीबाबत ट्विट करून प्रश्न उपस्थित केले आहेत.

एमपीएससीच्या परीक्षांसोबत मागील नियुक्त्यांच अद्याप भिजत घोंगड आहे. याबाबत प्रविण कोटकर नावाच्या तरुणाने ट्विट केले आहे. प्रविण कोटकरने सोशल मीडियातून नियुक्ती होऊनही त्याची सध्याची परिस्थीती व्यक्त केली आहे.

प्रविण कोटकर या तरुणाने ट्विट करत म्हटलं आहे की, माझी तहसीलदार म्हणून निवड झाली. ही निवड होऊन आता दहा महिने झाले. मात्र, सरकारनं अद्याप नियुक्ती दिलेली नाही. सध्या शेतमजूर म्हणून काम करतोय. लोकं आम्हाला हसतात आणि सरकारला शिव्या देतात. असे म्हणत नियुक्ती कधी? असा सवाल प्रविण यांनी उपस्थित केला आहे.

प्रविण यांनी ट्विट करुन सरकारला जाब विचारला आहे. दरम्यान, सरकारला एमपीएससीची परीक्षा घेण्यासोबतच रखडलेल्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत विचार करावा लागणार आहे.

परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थी संतप्त-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं १४ मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर गुरुवारी सकाळपासून विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. लोकसेवा आयोगाने घेतलेल्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी साधलेल्या संवादात येत्या आठ दिवसात परीक्षा घेऊ असे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! एमपीएससीची परीक्षा ८ दिवसातच होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी गोपीचंद पडळकर रस्त्यावर; पुण्यात ठिय्या आंदोलन
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा पुण्यात रास्ता रोको, परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.