‘एकीकडे रुग्णांना बेड मिळत नाही, अन् दुसरीकडे सरकार, संघमालक IPL वर एवढा खर्च करतायेत’

मुंबई | सध्या देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णसंख्या वाढत असून आरोग्य व्यवस्था कोलमडू लागली आहे. रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सुद्धा उपलब्ध नाहीत, यामुळे अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. अशातच सध्या आयपीएलची स्पर्धा सुरू आहे.

भारतात कोरोनाची परिस्थीती भीषण असताना आयपीएल सुरू आहे. यावरून आयपीएलमधील अनेक खेळाडूंनी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडू मायदेशी परतत आयपीएलबाबत आपले मत मांडत आहेत.

अशातच राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज अॅड्र्यू टायने आयपीएलचे सामने न खेळण्याचा निर्णय घेत आपल्या मायदेशी ऑस्ट्रलियाला परततला आहे. यावेळी बोलताना टायने भारतातील आयपीएलबाबत अनेक सवाल केले आहेत.

क्रिकेट डॉट कॉम डॉट एव्हीवर टाय म्हणाला, “भारतात कोरोनाचे संकट आहे. हॉस्पीटलमध्ये रुग्णांना बेड मिळत नाही. रोज शेकडो लोक कोरोनाचे बळी ठरत आहेत. असे असताना सरकार, फ्रांचाईझी कंपन्या आयपीएलवर एवढा खर्च कसं काय करतात”.

पुढे म्हणाला, “या लीगमुळे कोरोना पीडितांचा ताण कमी होत असेल. त्यांना रोगाशी लढण्याची उमेद मिळत असेल. पण भारतीय दृष्टीकोनातून विचार केला तर देशाच्या संकट काळात फ्रांचाईझी कंपन्या इतका खर्च कसं करु शकतात”. असं ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अॅड्र्यू टाय म्हणाला आहे.

टाय हा मुळचा ऑस्ट्रेलियामधील पर्थचा आहे. भारतामधून पर्थमध्ये येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्थमधील सरकार ऑस्ट्रेलियामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या कमी करण्याबाबत निर्णय घेउ शकतं. त्यामुळे  मला ऑस्ट्रेलियात प्रवेश नाकारण्याआधीच मी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला असल्याचंही टाय म्हणाला.

खेळाडूंनी माघार घेतली तरीही स्पर्धा सुरूच राहणार

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या खेळाडूंना आयपीएल न खेळण्याची इच्छा आहे. त्यांनी तसा निर्णय घेऊ शकता. त्यांना कुणीही अडवणार नाही. आयपीएलच्या स्पर्धा होणार आहेत. असं सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिल्पा शेट्टीला जबरदस्ती किस केल्यामुळे अडचणीत आला होता अभिनेता; वाचा पुर्ण किस्सा
भारतीय खेळाडूंना नाही पण परदेशी क्रिकेटपटूला दया आली, ऑक्सीजनसाठी दान केले ३७ लाख
जडेज्याने एकाच ओव्हरमध्ये ३७ धावा ठोकत आरसीबीला कुटले, तीन बळी घेत सामनाही जिंकवला

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.