टिम इंडीयात उभी फूट! विराटच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे संतप्त खेळाडूंची थेट जय शहांकडे तक्रार

अखेर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने T20 च्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. आपण t20 फॉरमॅटमध्ये कर्णधार नसलो तरी उर्वरित 2 फॉरमॅटमध्ये आपणच कर्णधार राहून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार असल्याचे विराटने स्पष्ट केले.

टीम इंडियाच्या संघात सगळे सुरळीत चालू असून केवळ कामाचा ताण कमी करण्यासाठी तसेच खेळावर लक्ष्य देण्यासाठी आपण राजीनामा देत आहोत असे विराटने कितीही म्हटले तरी टीम इंडियामध्ये वाद असून टीममध्ये फूट असल्याचे समजते .

साऊथम्पटनमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर (WTC Final) विराट कोहलीने केलेल्या वक्तव्यानंतर ज्येष्ठ खेळाडूने अमित जय शाह यांना फोन केला आणि टीममध्ये असुरक्षित वाटत असल्याचे सांगितले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप‌मध्ये पराभव पत्करल्यानंतर विराटने अन्य खेळाडूंच्या इंटेंट विषयी पत्रकार परिषदेत भाष्य केले होते. त्यामुळे अनेक खेळाडूंची नाराजी त्याने ओढवून घेतली होती.

अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह हे सध्या BCCI चे सचिव असून सचिवाने या वादात हस्तक्षेप करावा म्हणजेच हा वाद गंभीर असल्याचे समजते. या वादाची झळ पुढे येणाऱ्या काही सामन्यांना देखील बसू शकते.

येत्या नोव्हेंबरध्ये t२० विश्वचषक स्पर्धा असून विराट यात अंतिम वेळी या फॉरमॅटमधील कर्णधारची भूमिका निभावताना दिसेल. मात्र या आपल्यालाच फटका बसू शकतो असे रसिकांचेवादामुळे म्हणणे आहे.

 

महत्वाच्या बातम्या
फोनवर बोलण्यासाठी बाईक थांबवली अन् घात झाला; क्षणात होत्याचे नव्हते झाले! सांगा चूकी कुणाची?
७ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेण्याचा मोदींचा गुण मला सर्वांत जास्त आवडतो: प्रीतम मुंडे
देशात अडीच कोटी लोकांच्या लसीकरणानंतर काॅंग्रेसचा ताप वाढला; मोदींचा हल्लाबोल
पबमध्ये सुरू असलेला फॅशन शो हिंदूत्ववाद्यांनी गोंधळ घालून बंद पाडला; म्हणाले हा तर लव्ह जिहाद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.