न्यूझीलंडविरुद्ध मालिका विजयानंतर टीम इंडियाचे रात्रभर सेलिब्रेशन, मात्र 5 खेळाडू होते गैरहजर, कारण आले समोर

न्युझिलंडच्या विरुद्ध टी २० मालिका भारताने ३-० ने जिंकली आहे. यावेळी रोहित शर्माने कर्णधार म्हणून शानदार पदार्पण केले आहे. टीम इंडियाने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ७३ धावांनी पराभव केला. अशाप्रकारे, संघाने मालिका जिंकली आहे. यामुळे टीम इंडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या विजयानंतर टीमने रात्रभर जल्लोष केला, असे असताना या पार्टीत ५ खेळाडू गैरहजर दिसले. या खेळाडूंनी जास्तवेळ पार्टीत सहभाग घेतला नाही आणि त्याचे कारण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले आहे. यामुळे याची चर्चा रंगली आहे.

याचे कारण म्हणजे, टीम इंडिया आता दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला भिडणार आहे. त्यामुळे पार्टीपासून दूर राहिलेले पाच खेळाडू हे कसोटी मालिकेतील सदस्य आहेत. त्यामुळे या मालिकेसाठी निवडलेल्या खेळाडूंना कानपूर गाठायचे आहे. त्यामुळेच या खेळाडूंनी अधिक काळ पार्टीत सहभाग घेतला नाही.

या खेळाडूंमध्ये आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल व श्रेयस अय्यर हे खेळाडू आहे. शेवटच्या सामन्यात प्रथम खेळताना भारताने ७ विकेट १८४ धावा केल्या होत्या. रोहितने ५६ धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १११ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने ९ धावा देऊन ३ बळी घेतले.

आता 25 नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या सलग दुसऱ्या टी-२० मालिकेत क्लीन स्वीप केला. याआधी संघाने न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानावर ५ सामन्यांच्या मालिकेत ५-० ने पराभूत केले होते.

आता कसोटीत देखील विजय मिळवण्यासाठी भारतीय टीम सज्ज झाली आहे. टी 20 वर्ल्डकपमध्ये बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाने चांगले कमबॅक केले असून रोहित शर्मा टीमचा कर्णधार म्हणून चांगली कामगिरी बजावत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.