Team India : सुपर चार मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर बलाढ्या टिम इंडीयाचा आज दुबळ्या श्रीलंकेशी सामना झाला. पण दुबळ्या श्रीलंकेसमोरही भारताचा लाजिरवाना पराभव झाला. दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकला आणि भारताला फलंदाजीला आमंत्रीत करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 गड्यांच्या मोबदल्यात 173 धावा केल्या.
अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने भारताला पराभूत केले. श्रीलंकेने 19.5 षटकांत 4 गडी गमावून 174 धावा केल्या आणि सामना 6 गडी राखून जिंकला. या पराभवानंतर टीम इंडिया अंतिम फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडल्यात जमा आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला आता अफगाणिस्तानला पराभूत करावे लागेल. पण एवढे करूनही भागणार नाही. त्यासोबतच श्रीलंका आणि अफगाणिस्ताननेही पाकिस्तानला पराभूत करणे गरजेचे आहे. तेव्हाच भारत अंतिम फेरीत जाऊ शकतो.
नाणेफेक हरल्यानंत श्रीलंकेने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रीत केले. पण भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सलामीवीर केएल राहुल पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 7 चेंडूत 6 धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीला काही विशेष करता आले नाही. कर्णधार रोहीत शर्माने कप्तानी खेळी करत दमदार अर्धशतक झळकावले.
विराट कोहलीने 4 चेंडूंचा सामना केला आपण त्याला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी झाली. इथे भारताची सामन्यावर मज़बूत पकड़ झाली. 13व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा 41 चेंडूत 72 धावा करून बाद झाला. 15व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मधुशंकाने 3 विकेट घेत भारताला चौथा धक्का दिला. इथेच भारताची अवस्था संकट झाली होती.
29 चेंडूत 34 धावा करून सूर्यकुमार यादव देखील झेलबाद झाला. 18व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्याची विकेट पडली. पांड्याने 13 चेंडूत 17 धावा केल्या. यानंतर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने 13 चेंडूत 17, दीपक हुडाने 3 धावा केल्या. अंतिम क्षणी फटकेबाजी करण्यासाठी भारताकडे एकही मोठा फलंदाज उरला नाही.
आर अश्विन 17 चेंडूत 15 धावा करून नाबाद राहिला आणि अर्शदीप सिंगने 1 धाव काढली. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने 3, चमिका करुणारत्ने-दासून शनाकाने 2-2 आणि महेश टीक्षानाने 1 बळी घेतला. या सामन्यातील पराभवासोबत भारताच्या अंतिम प्रीत प्रवेश करण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन:
भारत: राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.
श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित अस्लंका, दानुष्का गुनाथिलका, दासुन शनाका (कर्णधार), भानुका राजपक्षे, वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्षना, असिथा फर्नांडो, दिलशान मधुशंका.
महत्वाच्या बातम्या
Super Four : पाकिस्तानंतर श्रीलंकेनेही भारताला टेकायला लावले गुडघे, अंतिम फेरीसाठी उरला फक्त ‘हा’ मार्ग
‘श्रीलंकेतील नेते पळून गेले, त्याप्रमाणे पवारांना पळून जावं लागेल’; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
मोबाईल डाटा संपल्यानंतर तुम्ही ‘अशा’ प्रकारे वापरू शकता मोफत इंटरनेट; जाणून घ्या ट्रिक्स