दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना १४८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाने १४८ धावांचे लक्ष १८.२ षटकात पार करत विजय मिळवला. या टी-20 मालिकेतील टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत(Rishabh Pant) संघातील खेळाडूंवर संतापला आहे.(team india captain rishabh pant angry on players )
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यातील पराभवासाठी टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंतने संघातील इतर खेळाडूंना जबाबदार धरले आहे. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, “आम्ही १० ते १५ धावा जास्त करायला हव्या होत्या. आम्ही गोलंदाजीला सुरवात केल्यानंतर भुवनेश्वर कुमारने चांगली गोलंदाजी केली. ”
“इतर वेगवान गोलंदाजांनी देखील पहिल्या ७ ते ८ षटकांमध्ये उत्तम गोलंदाजी केली. पण त्यानंतर आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही. आम्हाला विरोधी संघाच्या विकेट घेता आल्या नाहीत. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत सामना त्यांच्या बाजूने वळवला”, असे टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंतने सांगितले.
यावेळी टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंतने दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू हेनरिक क्लासेन आणि टेम्बा बावुमा यांचे कौतुक केले. टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत पुढे म्हणाला की, ” हेनरिक क्लासेन आणि टेम्बा बावुमा यांनी चांगली खेळी केली. त्यांची विकेट काढणं आमच्या गोलंदाजांना खूप अवघड गेलं. पुढील सामन्यात आम्ही चांगली कामगिरी करू दाखवू”, असे ऋषभ पंतने सांगितले आहे.
या टी-20 मालिकेतील दोन सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका संघाने विजय मिळवला आहे. या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. यामुळे टीम इंडियाला पुढील सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंतवर या सामन्याचे दडपण असणार आहे.
या सामन्यात फिरकीपटू युझवेंद्र चहलने सुमार कामगिरी केली आहे. युझवेंद्र चहलने ४ षटकात तब्बल ४९ धावा दिल्या आहेत. युझवेंद्र चहलला फक्त एक विकेट घेता आली आहे. या सामन्यात अक्षर पटेलने फक्त एक षटक टाकले आहे. या षटकात दक्षिण आफ्रिका संघातील फलंदाजांनी तब्बल १९ धावा मिळवल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
साहेब, तुम्ही माझ्यावर खुप अन्याय केला अन्…, शाहरूखनंतर आर्यननेही एनसीबीवर लावले गंभीर आरोप
पुन्हा सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीने भावूक झाली क्रिती सेनन म्हणाली, मला आनंद आहे की…
लाइव्ह सामन्यात भारतीय खेळाडूंना मारहाण, अफगाणिस्तानकडून गैरवर्तन; व्हिडिओ व्हायरल