टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील चार संघ सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. यामध्ये २ ग्रुप केले होते त्यातील पहिल्या ग्रुप मधून न्यूझीलंड आणि इंग्लंडची टीम सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे, तर ग्रुप दोन मधून भारत आणि पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे.
पहिल्या ग्रुपमध्ये न्यूझीलंड पहिल्या स्थानावर आहे तर दुसऱ्या ग्रुपमध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. त्यामळे न्यूझीलंड ही पाकिस्तान विरोधात खेळणार आहे तर इंग्लंड हे भारताच्या विरोधात खेळणार आहे. दरम्यान, सध्याच्या काळात पावसाने चांगलीच हजेरी लावल्यामुळे अनेक संघाना याचा जोरदार फटका बसला आहे.
पण तुम्हाला माहित आहे का, आयसीसीच्या नियमानुसार भारत इग्लंडविरुद्ध एक ओव्हरही न खेळता फायनलमध्ये पोहोचू शकतो. सेमी फायनल आणि फायनलच्या सामन्यांमध्ये पावसाची शक्यता घेऊन आयसीसीने एक दिवस राखीव ठेवण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता डकवर्थ लुईस नियम लागू करण्या संदर्भात नियम बदलण्यात आले आहेत.
ऑस्ट्रेलियात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे त्यामुळे जर सामन्याच्या दिवशी पाऊस आला तर तो सामना दुसऱ्या खेळवला जाईल. दुसऱ्या दिवस म्हणजेच जो दिवस राखीव ठेवला आहे त्या दिवशी खेळवला जाईल. तरीही सामना झालाच नाही आणि डकवर्थ लुईस नियम लागू होत नसल्यास ग्रुप स्टेजला जो संघ पहिल्या स्थानावर आहे त्या संघाच फायनलचं तिकिट पक्कं होईल.
सध्या पहिल्या ग्रुपमध्ये न्यूझीलंड आहे तर दुसऱ्या ग्रुपमध्ये भारत आहे. त्यामुळे भारत इंग्लंड सामना पावसातमुळे होऊ न शकल्यास भारताला थेट फायनलचं तिकीट मिळू शकतं. मात्र, क्रिकेट चाहत्यांनी दोन्ही सेमी फायनल कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडाव्यात अशी आशा व्यक्त केलीय.
आयसीसीच्या नियमानुसार टी-२० वर्ल्ड कप सामन्यात दोन्ही बाजूचे संघ पाच पाच ओव्हर खेळल्यानंतर डकवर्थ लुईस हा नियम लागू करण्यात येतो. मात्र, टी-२० वर्ल्डकपचं महत्त्व लक्षात घेता नव्या निर्णयानुसार दोन्ही संघांनी १०-१० ओव्हर्स खेळल्या असतील तरच डकवर्थ लुईस नियम लागू केला जाणार आहे.
पावसामुळं टी-२० वर्ल्ड कपचा अंतिम सामना न होऊ शकल्यास दोन्ही टीमला संयुक्त विजेते घोषित केलं जाणार आहे. टी-२० ची पहिली सेमी फायनल सिडनीमध्ये ९ नोव्हेंबरला होईल. दुसरी सेमी फायनल १० नोव्हेंबरला अॅडिलेडमध्ये होईल. तर, फायनल १३ नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये होणार आहे. पावसाचा फटका आयर्लंड-अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड, दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वे, न्यूझीलँड-अफगाणिस्तान यांच्या सामन्यांना बसला होता. तर, डकवर्थ लुईस नियमाप्रमाणं इंग्लंड पराभूत झालं होतं.
महत्वाच्या बातम्या
आलिया आई झाल्यानंतर महेश बाबूने केली खास पोस्ट; म्हणाला, ‘मुलीच्या जन्मापेक्षा जगात…
10 टनांहून अधिक सोने, 15900 कोटींची रोकड, तिरुपती मंदिराच्या एकून संपत्तीचा आकडा ऐकून डोळे फिरतील
जगात मिस्टर ३६० एकच, मी फक्त..सुर्याच्या प्रतिक्रीयेवर डिवीलीयर्स झाला भावूक; म्हणाला…