शिक्षकांनी हाती घेतला समाजसेवेचा वसा; कोरोना रुग्णांसाठी उभारलं ७० ऑक्सिजन बेडचं कोविड सेंटर

अहमदनगर | राज्यात कोरोनाने गेल्या वर्षभरापासून हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे प्रशासनाने कडक पावलं उचलली आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. कोरोनामुळे देशावर  मोठं संकट आलं आहे.

राजकीय नेते, खेळाडू, सिनेसृष्टीतील अभिनेते पुढे येत कोरोना रुग्णांच्या मदतीला धावले आहेत. सर्वसामान्य लोकं सुध्दा आपल्या परीने होईल तितकी मदत करत आहेत. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकही कोरोना रुग्णांसाठी पुढे सरसावले आहेत.

कोरोनामुळे वर्षभरापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचं नुकसान होउ नये म्हणून सरकारने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्याचा आदेश दिला आहे. विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान देण्याबरोबरचं या शिक्षकांनी समाजसेवेचा वसा हाती घेतला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनामुळे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. अकोले तालूक्यात रुग्णांना बेड,ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे उपचारासाठी वणवण फिरावं लागत आहे. त्यामूळे शिक्षकांनी पुढे येत कोविड सेंटर उभं करायचं  ठरवलं.

प्राथमिक शिक्षक, माध्यमिक उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक, कॉलेजमधील प्राध्यापक, सामाजिक कार्य करणारे व्यक्ती यांनी मिळून  निधी जमा केला आणि ७० ऑक्सिजन बेडचं अकोले तालूक्यातील सुगाव येथे  कोविड सेंटर उभं केलं आहे.

कोविड सेंटरचं उद्घाटन तालूक्यातील नेत्यांकडून करण्यात आलं आहे. शिक्षकांनी रुग्णांचे होत असलेले हाल पाहून हे कौतूकास्पद काम हाती घेतल्याने नेतेमंडळींनी शिक्षकांची पाठ थोपटली  आहे. कोविड सेंटरमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोविड सेंटरसाठी आमदार, माजी आमदार, सामाजिक संस्था, पतसंस्था, बॅंकेचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी खारीचा वाटा उचलला आहे. कोविड सेंटर उभारून झाल्यानंतरही शिक्षक थांबले नाहीत. कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर रुग्णांची देखभाल करत आहेत.

पोलिस, आरोग्य कर्मचारी,  डॉक्टर, नर्स, आरोग्य अधिकारी हे कोरोना योध्दे जीवाची बाजी लावून काम करत आहेत. अशातच मुलांना शिकवण्याचा वसा घेतलेल्या शिक्षकांनी रुग्णांसाठी मोलाची कामगिरी केल्याने त्यांच्याही कार्याला गौरवले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या-
निलेश लंके: एकेकाळी आमदाराच्या वशील्याने काम मिळवण्यासाठी फिरत होता, आज आहे आमदार
बाबा तु लवकर घरी ये, तुझी खुप आठवण येतेय; क्रिकेटपटूच्या लेकीनं काढलं मन हेलावून टाकणारं चित्र
आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही, केंद्र सरकारने डोळ्यावर पट्टी बांधलीय; न्यायालयाने झापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.