या शिक्षकाला जगात तोडच नाही! खडूच्या मदतीने जगभरात कमवलंय नाव, आकृत्या बघून वाटेल आश्चर्य

जगात असेही काही शिक्षक आहेत की त्यांच्या कलेचे सर्वत्र कौतुक केले जाते. त्यांना आपण कधीही विसरू शकत नाही. आपल्याला बायोलॉजी म्हणजेच जैवशास्त्रामधील आकृत्या काढायक खूप नकोसे वाटते. १० वी नंतर या क्षेत्रामध्ये शिकताना वेळोवेळी या आकृत्यांशी अभ्यासाच्या निमित्ताने संबंध येतोच.

या आकृत्या फारच किचकट वाटतात. मात्र तैवानमधील एका प्राध्यापकाची सध्या जगभरामध्ये चर्चा आहे ती याच आकृत्यांसाठी होत आहे. या प्राध्यापकाचे नाव झोहांग कुवाबीन असे आहे. तो तैवानमधील शुंदे युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजीमध्ये शिकवतो.

तो शिकवताना फळ्यावर केवळ खडूच्या सहाय्याने मानवी सांगाड्याचा आकृत्या अगदी हुबेहूब काढतो. फक्त पट्टी आणि खडूच्या मदतीने झोहांग इतक्या सहजपणे या आकृत्या काढतो की ते ग्राफिक वाटते. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मानवी शरीराचीच नाही तर तितकीच जाण त्याला चित्रकलेचीही आहे. अनेक देशांबरोबरच युरोपीयन आणि पाश्चिमात्य देशांमध्येही झोहांगच्या या कलेला पाहून अनेकजण थक्क झाले. यामुळे या शिक्षकाचे कौतुक केले जात आहे.

झोहांगला सुरुवातील तो त्याने काढलेल्या आकृत्या सोशल मीडियावर पोस्ट करायचा. त्याचपासून त्याला एकदा एका विद्यापिठामध्ये मानवी शरीराची रचना काढून दाखवण्यासंदर्भातील नोकरीची संधी मिळाली. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिले नाही. आज तो जगात फेमस झाला आहे.

झोहांगने मनापासून वैद्यकीय क्षेत्राचा आणि मानवी शरीर रचनेचा अभ्यास केला आणि या कलेमध्ये कौशल्य प्राप्त केले. आज त्यांनी काढलेल्या आकृत्या अनेकजण कौतुकाने बघतात. यामुळे ते चर्चेत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.