नाश्त्याला चहा चपाती खाण्याची चूक करताय तर आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम

सध्याच्या जीवनशैलीत सर्वांची धावपळ सुरू आहे. अशात दिवसाची सुरु पोटभर नाश्त्याने होते. कामाच्या घाईत सकाळी उठून लोक दुपारसाठी बनवलेली चपाती चहासोबत खातात. चहा आणि चपाती एकत्र खाल्लाने त्याचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात.

भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात सकाळी गरम गरम चपाती सगळ्यांच्याच घरात बनते. तर सकाळी उठून नाश्त्याचे पदार्थ बनवणे अनेकांना शक्य होत नाही. अशा वेळी खूप जण आवडीने चहा आणि चपाती खातात. गरम चहा चपातीच्या खमंग चवीची अनेकांना तर सवयच लागली आहे. परंतु हे आरोग्यादायी आहे का हा मोठा सवाल आहे.

मुख्य म्हणजे चहा हे शरिराला हानिकारक आहे. ते पिणे सोडले पाहीजे. परंतु चहाप्रेमींना चहाची सवयच लागली आहे. तर चहा पेक्षाही आरोग्याची जास्त हानी चहा चपाती खाल्ल्याने होते. यामुळे शरिराला अनेक रोग चिकटण्याची शक्यता आहे.

चहा आणि चपाती एकत्र खाल्ल्याने त्यामधून शरिराला मिळाणारी पोषकद्रव्य फारच कमी आहेत. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आवश्यक असणारी प्रोटीन, कार्बोहायड्रेट, आयर्न आणि कॅल्शियमची गरज यामधून पुर्ण होत नाही. तर चहामध्ये टॅनिन, स्ट्रेक्टीन व निकोटिन हे घटक असतात.

चहा चपातीमुळे शरिरामध्ये साखरेचे प्रमाण वाढते. तसेच मळमळायला सुरुवात होते. चहा चपातीचा सर्वात मोठा तोट म्हणजे यामुळे पित्ताचा भयानक त्रास होण्यास सुरुवात होते. चहा पिल्याने भुक लागत नाही यामुळे पौष्टिक आहार पोटात जात नाही. या कारणाने शरिराची वाढ व्यवस्थित होणार नाही.

दिवसाची सुरूवात भरपेट नाश्ता, त्यानंतर जेवण आणि त्याहून हलके रात्रीचे जेवण असे सुत्र मुख्य आहे. असा आहार ठेवल्यास तुमचे आरोग्य स्वास्थ्यकारक राहण्यास मदत होईल.

चहा चपाती शिवाय तुम्ही गूळ-तूप-चपातीचा रोल, तूप-साखर-चपाती, अंडी-चपाती, सुकी भाजी आणि चपातीचा रोल, किंवा तुम्ही सकाळीच पोटभरुन जेवण करु शकता. तसेच नाश्ताच करायचा असेल तर दही, अंड, दूध, पनीर यांचा समावेश असलेले पदार्थ खायला हवे.

महत्वाच्या बातम्या-
सकाळी नाश्त्यामध्ये पोहे खाल्ल्याने आरोग्यावर होतात ‘हे’ परिणाम
लोकल फॉर व्होकल! शेणापासून बनवलेल्या पेंटला देशभरात मिळतोय प्रतिसाद
तुकाराम मुंढेंचा कोरोना काळात भाजपच्या नेत्यांसोबत राडा होऊनही गडकरींनी केले मुंढेंचे कौतुक
झोपेत असलेल्या नवऱ्याला घातले मुलींचे कपडे आणि केला ‘हा’ विचित्र प्रकार, फोटो व्हायरल  

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.