TCS मधील लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून शेती करतेय ही तरुणी, आज वर्षाला कमावतेय तब्बल २० कोटी रुपये!

एकीकडे शेतकरी शेतात दिवस रात्र राबून अपेक्षेप्रमाणे पीक उत्पादन न होणे तसेच बाजारात चांगला भाव न मिळाल्याने बेजार झाल्याच्या गोष्टी आपण पाहत आलोय पण दुसरीकडे अनेक तरुण तरुणी शेती करून लाखों रुपये कमवतानाच्या गोष्टीही आपण पहिल्या आहेत. अशीच एक गोष्ट आहे ती म्हणजे हैद्राबादच्या गीतांजली राजमनी या तरुणीची.

गीतांजली हिने लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून तिने आपला कल सेंद्रिय शेतीकडे वळवला आहे. आणि या शेतीमधून ती तब्बल २० कोटी कमवत आहे. गीतांजली हिचा जन्म केरळमध्ये झाला. तीच बालपण केरळमध्ये गेल्यामुळे तिला शेतीची आवड निर्माण झाली.

धावपळीच्या जीवनात लोकांचे दैनंदिन आहाराकडे लक्ष राहत नाही आहे. बाजारात रासायनिक भाजीपाला वाढला आहे. सेंद्रिय भाजीपालाच्या नावाने लोकांची फसवणूक केली जात आहे.यामधूनच तिला सेंद्रिय भाजीपाला विकण्याची आयडिया आली.

२०१७ मध्ये तिने स्वतः ची फार्मिंजन फार्मिंग कंपनीही सुरू केली. तिला या व्यवसायात यश मिळत गेलं आणि सध्या ती हैद्राबाद, बंगळुरू,सुरत, अशा अनेक शहरात सेंद्रिय शेती करते.ही शेती ती ४६ एकरमध्ये करते. मोठ्या कंपन्या तिला यासाठी स्पॉन्सरशिपही देतात. अनेकांना ती सेंद्रिय शेती करण्याचा सल्ला देखील देते. गीतांजलीचे वार्षिक उत्पन्न २० कोटी आहे. तसेच १६००० पेक्षा जास्त ग्राहक तिचाकडून सेंद्रिय भाजीपाला खरेदी करतात.

दोन वर्षाची असतानाच तिच्या वडिलांचे एका अपघातात निधन झालं. आई आणि भावानेच तिला लहानाचं मोठ केलं. त्यानंतर २००१ मध्ये गीतांजली ने तीच BSc. पर्यंतच शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंटरनॅशनल बिजनेस मधून MBA पूर्ण केलं. यानंतर गीतांजलीने टीसीएस या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवली.

या कंपनीमध्ये ती ग्लोबल बिजनेस रिलेशनशिप मॅनेजर म्हणून या पदावर कार्यरत होती. या नोकरीमधून तिला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. स्वतःचा व्यवसाय करून काहीतरी वेगळं करायचं म्हणून तिने टीसीएस मधील नोकरी सोडली. याचदरम्यान तीच लग्न झालं. व्यवसायात उतरण्यासाठी तिला तिच्या पतीने मदत केली. आणि आज ती व्यवसायात यशस्वी ठरली.

 

महत्वाच्या बातम्या
आजींचे वय ७५ पण जोश २५ चा! नागपुरच्या या आजींचे फाफडे आहेत जगप्रसिद्ध, जातात अमेरिकेपर्यंत
सोनू सुद २० कोटींच्या करचोरीत अडकला; सबळ पुरावे असल्याचा आयकर विभागाचा दावा
अजितदादा तब्बल १३ नगरसेवक फोडत भाजपला देणार मोठा धक्का; स्वत:च केले जाहीर
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी पुणे पुर्णपणे बंद, कठोर निर्बंध लावण्याचा अजितदादांचा आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.