काय सांगता! टॅक्सी ड्रायव्हरने झोपा काढून कमवले तब्बल ११ लाख रुपये, पहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील व्यक्तीने सात तास झोप काढून तब्बल ११ लाख रुपये कमवले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा व्यक्ती टॅक्सी ड्रायव्हर आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील व्यक्तीचे वय २६ वर्षे आहे. हा व्यक्ती ‘एशियन एंडी’ नावाचा युट्यूब चॅनेल चालवतो. याशिवाय तो लाइव्ह गेमिंगचे स्ट्रीमिंग करतो. अशाच एका लाइव्ह स्ट्रीमिंगमधून त्याने चक्क ११ लाख रुपये कमवले आहेत.

व्हायरल व्हिडीओतील थक्क करणारी बाब म्हणजे तो त्याच्या युट्यूब चॅनेलवरील लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान झोपला होता. परंतु त्याने पैसे कमवण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये तो झोपला असताना त्याने लोकांना डोनेशन किंवा डिस्टर्ब करुन झोपेतून उठवण्याचे चॅलेंज दिले होते.

यूट्यूब चॅनेलवर त्याचे चॅलेंज स्विकारणारे लोक त्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पैसे डोनेट करत होते. या डोनेशन मधून त्याने जास्त पैसे मिळवले आहेत. तसेच लोकांनी त्याच्या झोपेत व्यत्यय आणण्यासाठी वेगवेगळ्या आवाजातील ऑडिओ क्लिप पाठवल्या आहते. परंतु लोक त्याची झोप मोडू शकले नाहीत.

 

व्हिडीओ अपलोड केल्यानंतर या टॅक्सी ड्रायव्हरने १६ हजार डॉलर मिळवले होते. हा व्हिडीओ आतपर्यंत ४० लाख लोकांनी पाहिला आहे. रोज फक्त १६ डॉलर कमवणाऱ्या व्यक्तीला अशाप्रकारे हजारो डॉलर मिळाल्यानंतर त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शेट्टीचे पितळ पडले उघडे! ‘असे’ शूट होतात चित्रपटातील कार स्टंट, पहा व्हिडीओ
सोशल मिडियावर धुमाकूळ घालणाऱ्या श्वेताचे भन्नाट मिम्स व्हायरल
पहिल्याच ऑक्शनमध्ये ५ कोटी २५ लाखांना विकला गेलेला शाहरूख खान कोण आहे माहिती का?
पहा व्हिडीओ! वरातीत कारचं ‘सनरुफ’ उघडून नाचत होती नवरी, अन् झालं मोठा अनर्थ..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.