आज राज्यातील ‘या’ भागात धडकणार ताऊते चक्रीवादळ; हवामान खात्याने सांगीतले ‘असा’ करा बचाव

कोरोना ने राज्यात हाहाकार उडवला असतानाच आता ताशी १५० पेक्षा जास्त वेगाने वाहत असलेले ‘ताऊते’ चक्रीवादळ आज महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे आजचा दिवस सतर्कतेचा आहे. अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ताऊते’ चक्रीवादळाची तीव्रता अधिक आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती शुक्रवारी निर्माण झाली आहे. केरळ, तामिळनाडू व कर्नाटक समुद्र किनाऱ्यावर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रात देखील जोरदार वारे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

यामुळे महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याकाळात वाहणारा सोसाट्याचा वारा व मुसळधार पर्जन्यवृष्टी लक्षात घेवून नागरिकांनी मुसळधार पावसात व सोसाट्याच्या वार्‍यात घराबाहेर पडणे टाळावे. घराबाहेर असल्यास पाऊस व वारा थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

तसेच वारा वाहत असताना सुरक्षित ठिकाणी राहा व प्रवास करू नका. विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये व मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. असेही सांगण्यात आले आहे.

आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस आणि जोराचा वारा सुटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे फळबागांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.

अधिक काळजी घेण्याची गरज आहे. तसेच या काळात घराबाहेर पडू नये असेही सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातून गुजरातकडे आणि राजस्थानकडे हे वादळ जाणार आहे. यामुळे येणाऱ्या दोन तीन दिवसांत अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते वादळाचा हाहाकार; कोकण किनारपट्टीचे मोठे नुकसान

सुप्रीम कोर्टानंतर आता रघुराम राजन यांनी केंद्राला झापले, म्हणाले, महाराष्ट्राला जमले मग देशाला का नाही?

मराठमोळ्या श्रेयसला बाॅलीवूडमध्ये सिनेमे का मिळत नाहीत? स्वत: श्रेयसनेच सांगीतले ‘ते’ घाणेरडे कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.