पुणे | सध्याच्या काळाविषयी बोलायचे झाले तर लोकांना दिखाऊपणा करण्यात अधिक मजा वाटते. स्वत:च्या पैशांची श्रीमंती वारंवार झळकवण्याचा प्रयत्न सातत्याने लोक करत असतात. यासर्वांच्या अगदी उलट व्यक्तीमत्त्व म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा. उद्योगपती रतन टाटा हे त्यांच्यातील साधेपणा, सामाजिक जाण, माणुसकी जपणूक यांमुळेच जास्त चर्चेत असतात.
रतन टाटांच्या कृतीची चर्चा सोशल मीडियावर सतत होत असते. असाच एक प्रसंग पुण्यात पहायला मिळाला आहे. रतन टाटा हे पुण्यातील एका माजी कर्मचाऱ्याच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी थेट कर्मचाऱ्याच्या पुण्यातील घरी पोहचले. या प्रसंगाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकरी हे फोटो शेअर करत त्यांचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
Sir Ratan Tata visited Pune to meet his Ex Employee who is ailing for last 2 years.
There is lot to learn for all entrepreneurs that money is not everything. All that matters is being great human being. pic.twitter.com/TFORvFSUxM
— Awanish Sharan (@AwanishSharan) January 7, 2021
रतन टाटांना त्यांचा एक कर्मचारी दोन वर्षांपांसुन आजारी असल्याचे समजले. यानंतर त्यांनी अचानक पुण्याच्या या कर्मचाऱ्याच्या घरी भेट दिली. हा दौरा टाटा यांनी पुर्णपणे वैयक्तिक ठेवला होता. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या घरातील व्यक्तींना रतन टाटा घरी आल्याचा विश्वासचं बसत नव्हता.
There is no parallel to @RNTata2000 . Just see the JAMSHEDPUR…how much he cares for people working in his factory.. can be seen there only. Lot of love and regard for him.
— PANKAJ CHOUDHARY (@PANCHOBH) January 7, 2021
रतन टाटा यांच्या या कृतीबद्दल नेटकऱ्यांनी त्यांचे भरभरुन कौतुक केले आहे. व्हायरल झालेल्या फोटोवर अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून आल्या आहेत. फोटोत रतन टाटा हे एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे कर्मचाऱ्याच्या घरी पाहुणचार घेत आहेत. त्यांचा हा फोटो खुप काही गोष्टी व्यक्त करण्यासाठी पुरेसा आहे.
महत्वाच्या बातम्या-
देवमाणुस! आजारी कर्मचाऱ्याला भेटायला मुंबईहून पुण्याला गेले रतन टाटा
वाहतूकीचे नियम मोडल्याने रतन टाटा यांना ई चलन? तक्रारीनंतर धक्कादायक माहिती आली समोर
‘या’ व्यक्तींना लस मिळणार नाही’; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोठे वक्तव्य