Share

टाटाची इलेक्ट्रिक कार होणार लाँच, सिंगल चार्जमध्ये धावणार तब्बल ५९० किमी; किंमत आहे फक्त..

सध्या पेट्रोल-डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे लोक आता इलेक्ट्रिक कारला प्राधान्य देत आहे. अशात टाटा मोटर्स २०२० ऑटो एक्सपोमध्ये नेक्स्ट जनरेशनमधली टाटा सिएरा इलेक्ट्रिक कारचे लाँचिंग करणार आहे. तसेच कंपनीने त्याचे प्री-बुकिंग सुरू केले आहे. याची किंमत १४ लाखांपर्यंत असून शकते. (tata sierra new electric car 590 range)

कंपनीने स्वतः कारबाबत माहिती दिली आहे. अशा स्थितीत ही कार लवकरच रस्त्यांवर फिरताना दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कार एका चार्जमध्ये ५९० किमीची रेंज देणार आहे. टाटा इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. टाटाची Nexon EV आणि Tigor EV ला चांगलेच पसंत केले जात आहे.

टाटा मोटर्सने एक पोस्ट शेअर केली असून, त्यात एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. यामध्ये New EV आणि Guess whats असे शब्द वापरले गेले आहेत. या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की, ही नवीन इलेक्ट्रिक कार टाटा सिएरा ईव्ही असणार आहे.

या इलेक्ट्रिक SUV कारमध्ये ६९kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी दोन विभागात विभागली गेली आहे. तसेच ही कार FWD (सिंगल इलेक्ट्रिक मोटर) आणि AWD (दोन इलेक्ट्रिक मोटर्स) या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. पॉवर आउटपुटची माहिती कंपनी लाँचिंगदरम्यान देणार आहे.

या कारची लांबी ४.१ मीटर आहे, ज्यामुळे ही कार ह्युंदाई क्रेटाच्या तुलनेत कॉम्पॅक्ट बनते. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, व्हिडिओमध्ये दिसते कारमध्ये १२.१२ इंच टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे. यात IRA Place Pro Connect फिचर आहेत. हे ७.७ इंच एडीएम प्रो प्लाझ्मा स्क्रीन वापरते, जे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. तसेच, या कारला एक मोठे पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात आले आहे.

या कारला ३६० डिग्री व्ह्यू कॅमेरा मिळेल, ज्याच्या मदतीने ही कार सहज पार्क करता येईल. तसेच या कारसाठी १९ इंची चार अलॉय व्हील वापरण्यात आली आहेत. या कारमध्ये हाय स्पीड वॉर्निंग सेन्सर आहे. तसेच यूजर्सना टर्न इंडिकेटर आणि दरवाजा उघडण्याचा इशारा देणारा साऊंडदेखील मिळेल.

महत्वाच्या बातम्या-
बाबो! बाईकवर समोर बसली होती पत्नी, मागे होत्या ३७ खुर्च्या, पाहून आनंद महिंद्राही झाले अवाक, म्हणाले..
..त्यामुळे वृद्ध महिलेने ५० लाखांची संपत्ती, १० तोळे सोने केले राहुल गांधींच्या नावावर, राहुल गांधींही झाले अवाक
“असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही…”; मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेचा गृहमंत्र्यांवर पलटवार

खेळ

Join WhatsApp

Join Now