टाटांचा ‘हा’ शेअर वर्षात पोहोचला ४७ रुपयांवर, ज्यांनी गेल्यावर्षी गुंतवले १ लाख त्यांचे झाले १२ लाख

मुंबई । सध्याच्या काळात अनेकजण गुंतवणुकीचे पर्याय शोधत असतात. मात्र ज्याचा अभ्यास जास्त असेल तरच आपला फायदा होऊ शकतो. आता टाटा टेलिसर्व्हिसेसच्या शेअरने गुंतवणुकदारांना फक्त १२ महिन्यातच १,१२९ टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला आहे. यामुळे त्यांचा मोठा फायदा होणार आहे.

ज्यांनी वर्षभरापूर्वी टाटा टेलिसर्व्हिसेसचा शेअर विकत घेतला होता, त्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे कमावले आहेत. गेल्यावर्षी जूनमध्ये हा शेअर ३.८२ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर होता. सध्या हा शेअर मुंबई शेअर बाजारात ४६.९५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो.

यामुळे आपल्याला अंदाज येईल की हा शेअर किती मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामध्ये तुम्ही १ लाख लाख रुपये गुंतवले असते तर आज तब्बल १२.२९ लाख रुपये इतके झाले असते. मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत टाटा टेलिसर्व्हिसेसने २८८.२९ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता.

जून २०२० अखेर कंपनीने १,०६९ कोटी रुपयांच्या तोट्याची नोंद केली होती. मात्र तेव्हापासून कंपनीच्या कामगिरीत सुधारणा होत तोटा कमी होतो आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपनीवर एकूण १७,७७४.४७ कोटी रुपयांचे कर्ज आहे. आता टाटा सन्सने टाटा टेलिसर्व्हिसेससाठी उचललेल्या पावलांमुळे कंपनीच्या शेअरच्या किंमतीत जबरदस्त वाढ झाली होती.

आता कंपनीची पुनर्उभारणी होत आता ती टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस या नावान व्यवसाय करणार असून लघु आणि मध्यम कंपन्यांना, व्यवसायांना सेवा पुरवणार आहे. यामुळे अजून मोठा यामुळे फायदा होणार आहे.

ताज्या बातम्या

भररस्त्यात कॅब ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या त्या तरुणीवर गुन्हा दाखल, वाचा संपूर्ण प्रकरण

VIDEO: वर्दी उतरवून टाकेल म्हणत तरुणीने पोलिसाला मारली लाथ; कारचे चलन कापल्यामुळे तरुणीचा हाय व्हॉल्टेज ड्रामा

काजू , बदाम आणि अक्रोड भिजवून खात असाल तर हा लेख वाचा; आरोग्यास होणारा धोका टळेल…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.