टाटांनंतर आता रिलायन्सही आले मदतीला धावून, मुंबईत ८७५ ICU बेडची करणार सोय

मुंबई । देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. अनेकांना ऑक्सिजन, बेड्स देखील उपलब्ध होत नाहीत. यामुळे मदतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत.

आता रिलायन्सकडून देखील मदत केली जात आहे. रिलायन्स फाऊंडेशनकडून मुंबईत ८७५ नवे बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामुळे आता अनेकांना बेड उपलब्ध होण्यास मदत होत आहे.

यामध्ये एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये ६००, वरळतील एनएससीआयमध्ये १००,  सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये ४५ आयसीयुसह १२५ बेडस् तर ट्रायडंट, बिकेसी येथे १०० बेडची नव्याने उपलब्धता करुन देण्यात आली आहे.

कोरोना रुग्णांसाठींच्या एकूण ६५० खाटांचे परिचलन व व्यवस्थापन करेल. याशिवाय अधिकच्या १०० ICU बेड्सची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. रतन टाटा यांच्याकडून देखील मोठी मदत सध्या सुरू आहे.

हे बेड १५ मेपासून उपलब्ध होतील, यासाठी ५०० हून अधिक वैद्यकीय फ्रंटलायनर्स यामध्ये डॉक्टर, नर्स, नॉन मेडिकल स्टाफ यांना सुविधांच्या देखभालीसाठी नेमण्यात आले आहे. यामुळे ज्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, त्यांना याचा फायदा होणार आहे.

यामध्ये वेगवेगळे कक्ष करण्यात येणार आहेत. क्वारंटाइन वॉर्ड देखील उपलब्ध असणार आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी म्हणाल्या की, या लढण्यासाठी  रिलायन्स फाउंडेशन कटिबद्ध आहे. आमचे डॉक्टर आणि फ्रंटलाइन वर्कर्स अहोरात्र राबून काम करत आहेत.

तसेच याशिवाय महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, दमण दीव, नगर हवेली याठिकाणी रोज ७०० MT ऑक्सिजनचा पुरवठा फाउंडेशनच्या वतीने मोफत देण्यात येत आहेत. शक्य तेवढी मदत सध्या केली जात आहे.

ताज्या बातम्या

गर्लफ्रेंड घरी यायची आणि पत्नीसोबत मिळून माझ्यासाठी जेवण बनवायची; रवी किशनचा गौप्यस्फोट

अहमदनगरच्या एका खेड्यात जन्मलेले सदाशिव अमरापूरकर कसे बनले बॉलीवूडचे खतरनाक खलनायक?

चारच दिवसात टाटांनी देशाला दिलेला शब्द पुरा केला! ऑक्सिजन टँक घेऊन विमाने भारतात दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.