टाटा प्ले फायबर, पूर्वी टाटा स्काय ब्रॉडबँड म्हणून ओळखले जात होते. पण आता कंपनी ग्राहकांना एका महिन्यासाठी 1150 रुपयांचा प्लॅन मोफत देत आहे. कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता कंपनी हा प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनसह ग्राहकांना २०० एमबीपीएस डाउनलोड आणि अपलोड स्पीडसोबत हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन मिळेल.(tata play offer 1150 rupees brodband connection free)
ही योजना कंपनी ऑफर करत असलेल्या JioFiber च्या ‘Try and Buy’ योजनेसारखीच आहे. टाटा प्ले सुरवातीला आपल्या ग्राहकांना सेवेच्या गुणवत्तेची चाचणी घेऊन नंतर ती खरेदी करण्यास सांगत आहे. Tata Play Fiber वापरकर्त्यांना 200 Mbps प्लॅन मोफत हवा असल्यास, त्यांना कंपनीला 1500 रुपयांचं रिफंडेबल सेक्युरिटी डिपॉझिट भरावं लागेल.
रिफन्ड मिळवण्यासाठी ग्राहकांना ३० दिवसांच्या आत कनेक्शन रद्द करावं लागेल. टाटा प्ले फायबर ऑफरमध्ये ग्राहकांना मोफत लँडलाइन कनेक्शनही देण्यात येणार आहे. या चाचणी योजनेसह, ग्राहकांना हाय-स्पीडमध्ये 1000GB डेटा मिळतो. टाटा प्ले फायबर योजनेमुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
जर ग्राहकाने 30 दिवसांची सेवा घेतल्यानंतर कनेक्शन रद्द केले, तर त्याच्याकडून 500 रुपये आकारले जातील आणि सुरक्षा ठेवीतून 1,000 रुपये परत केले जातील. त्यामुळे ग्राहकांनी सदस्यता रद्द करण्याऐवजी कंपनीने ऑफर केलेल्या योजनांपैकी एक निवडल्यास त्यांना उत्तम फायदा मिळू शकतो. त्यासाठी ग्राहकांना टाटा प्ले फायबरची सेवा घ्यावी लागणार आहे.
जर ग्राहकाला 100 एमबीपीएस प्लॅन किमान तीन महिन्यांसाठी घ्यायचा असेल, तर त्याला पूर्ण 1500 रुपये परत केले जातील. ग्राहकांना तीन महिन्यांसाठी 50 Mbps प्लॅनसह मिळालेला परतावा 500 रुपये असेल आणि 1,000 रुपयांची सुरक्षा ठेव वॉलेटमध्ये राहील. याबाबतीत ग्राहकांची कोणतीही फसवणूक केली जाणार नाही, अशी हमी कंपनीने दिली आहे.
ग्राहकांनी मासिक योजना निवडल्यास, त्यांना तीन महिन्यांच्या सक्रिय सेवेनंतर 1000 रुपये परत केले जातील आणि 500 रुपये सुरक्षा ठेव वॉलेटमध्ये राहतील. TRAI & BUY योजना ही कंपनीची प्रमोशनल ऑफर आहे आणि ती फक्त नवी दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, ग्रेटर नोएडा, मुंबई आणि देशातील निवडक भागात उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या :-
स्टॉक नाही ही तर कुबेराची खाण! अवघ्या ६० पैशांच्या शेअरनं केली कमाल; १ लाखाचे झाले ३६ लाख
ओवेसींच्या विधानावरुन नवा वाद ! ‘मृत्यूनंतर मला औरंगाबादमध्ये दफन केलं जावं’; शिवसेना भडकली…
भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, कलाविश्वावर शोककळा