देवमाणूस टाटांचा मदतीचा सपाटा सुरूच; हवाईमार्गे परदेशातून ऑक्सिजन टॅंक भारतात दाखल

कोरोनाने थैमान सध्या देशात सुरू आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता भासू लागली आहे. रेमडेसिवीर तसेच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र देशभरातील अनेक भागांमध्ये दिसत आहे. यामुळे अनेक रुग्ण दगावत आहेत.

यामुळे ऑक्सिजन मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. यामुळे टाटा उद्योग समुहाने दोन दिवसांपूर्वीच पुढाकार घेत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी परदेशातून ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला.

आता त्यांनी शब्द दिल्यानंतर अवघ्या चार दिवसात म्हणजेच शनिवारी टाटा ग्रुप्सने भारतीय हवाई दलाच्या मदतीने चार ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकर भारतात आणले आहेत. यासंदर्भातील माहिती कंपनीनेच ट्विटरवरुन फोटो शेअर करत दिली आहे.

टाटा समुहाने मदत म्हणून देऊ केलेले चार ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकर सिंगापूरवरुन वेळेत निघाले आहेत. हे टँकर्स आणण्यासाठी भारतीय हवाई दलाने विशेष विमान सिंगापूरला पाठवले होते. यामुळे आता ऑक्सिजन तुटवड्यावर काहीसा दिलासा मिळणार आहे.

सिंगापूरमधील अधिकारी आणि भारत सरकारच्या मदतीने हे टँकर भारतात आणण्यात आले आहेत. अजून २० टँकर टाटा समुहाकडून भारतात आणले जाणार आहेत. याची मोठी मदत होणार आहे.

टाटा हे देशावर आलेल्या संकटात मदतीसाठी धावून येतात. कोरोना काळात त्यांनी आतापर्यंत मोठी मदत केली आहे. यामुळे टाटांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सोशल मीडियावर त्यांना देवमाणूस म्हटले जाते. रतन टाटांच्या रुपात देव नक्की पाहिलाय, असेही अनेकांनी म्हटले आहे. देशासाठी त्यांनी मोठी मदत चालूच ठेवली आहे.

ताज्या बातम्या

ऑक्सिजन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये जीव तोडून काम करताहेत कामगार; जेवनही करत नाहीत

माझ्यापुढे तुझी औकात काय म्हणत नर्सने पोलीसांसमोर डाॅक्टरच्या कानाखाली वाजवल्या; पहा व्हिडीओ

‘एकीकडे रुग्णांना बेड मिळत नाही, अन् दुसरीकडे सरकार, संघमालक IPL वर एवढा खर्च करतायेत’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.