टाटांचा विजयी झेंडा! टाटा नेक्साॅन ठरली भारतातील सर्वाधिक खपाची नंबर वन कार

नवी दिल्ली | देशात पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.  बाजारातही पेट्रोल डिझेलपेक्षा सीएनजी, इलेक्ट्रिक कारला मोठी मागणी आहे.

कंपन्या इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्यावर भर देत आहेत. भारतीय कंपनी टाटानेही नेक्सॉन ईवी ही इलेक्ट्रिक कार बाजारात आणली आहे. या कारचा लूकही शानदार देण्यात आला आहे. या कारने इतर कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कारला विक्रीमध्ये टक्कर दिली आहे.

एप्रिल महिन्यामध्ये या कारची ५२५ युनिट विक्री झाली होती. मागील महिन्यात एकूण ७४९ युनिट्सची विक्री झाली होती. यामध्ये टाटच्या नेक्सॉन कारचा हिस्सा मोठा आहे. टाटाच्या या कारने इलेक्ट्रिक कारच्या विक्रीमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे.

दुसऱ्या नंबरला एमजी कंपनीची ZS ईवी ही कार आहे. एमजी कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. गेल्या महिन्यात या कारची १५६ युनिट्सची विक्री झाली होती. इलेक्ट्रिक कारच्या विक्रीच्या तुलनेत या कारची जास्त विक्री झाली नाही.

इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत तीन नंबरला आहे ती म्हणजे टाटाची टिगोर ईवी. या कारला ग्राहकांची जास्त पसंदी मिळू शकली नाही. या कारची ५६ युनिट्सची विक्री झाली आहे. नेक्सॉन कार इतकी पसंदी या कारला मिळू शकली नाही.

चौथ्या क्रमांकावर आहे ह्युंदाई कपनीची कोना ईवी. ह्युंदाईने  इलेक्ट्रिक कार बाजारात आणली होती. ह्युंदाईची ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे. एप्रिल महिन्यात या कारची  फक्त १२ युनिट्सची विक्री झाली होती.

भारतीय बनावटीची टाटा नेक्सॉन ईवी कारला भारतीय ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली आहे. नेक्सॉन ईवी देशात सर्वात जास्त विक्री होणारी कार ठरली आहे. एकदा फुल चार्ज केल्यानंतर नेक्सॉन ईवी ३१२ किमी पर्यंत धावू शकते.

फास्ट चार्जरने नेक्सॉनची बॅटरी ० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्जिंग करण्यासाठी १ तास पुरेसा आहे. या कारमध्ये इलेक्ट्रिक मोटार इंजिन १२९PS पॉवर २४५Nm पीक टॉर्क जनरेट करते.

महत्वाच्या बातम्या-
करोडो रूपयांचा मालक आहे ‘कुली’मधील हा छोटा अमिताभ बच्चन, या फिल्डचा आहे बादशाह
टाटा पुन्हा टाॅपवर; सर्व कंपन्यांना मागे टाकत टाटाची ‘ही’ शानदार कार ठरली नंबर वन
कोरोनाने हिरावला गरिबांचा डॉक्टर; पाठोपाठ आईनेही सोडला जीव; जामखेडवर शोककळा
६ वर्षांपूर्वी विराट कोहलीने पाहिलेले ‘ते’ स्वप्न आज झाले पूर्ण, सर्व भारतीयांसाठी ठरला आनंदाचा क्षण

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.