Tata Motors : टाटा मोटर्स कार उत्पादक ब्रँड म्हणून जगप्रसिद्ध आहे. टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षांत नवनवीन कर लाँच करून ग्राहकांची मने जिंकली आहेत. ही कंपनी भारतात केवळ सतत नवीन मॉडेल्स लॉंचच करत नाही तर ग्राहकांसाठी यात वेगवेगळे फिचर्स देखील घेऊन येते.
अलीकडेच या कंपनीने टाटाचे काझीरंगा एडिशन लॉंच केले होते. आता ही कंपनी भारतात नवीन वेगवान SUV घेऊन येत आहे. टाटा मोटर्स कंपनी आपली बहुप्रतिक्षित Tata Blackbird SUV भारतात आणण्याच्या तयारीत आहे. या कारमध्ये १.५ लीटर पेट्रोल आणि १.५ लीटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकते.
ही कार टाटा हॅरिअरच्या खाली आणि टाटा नेक्सॉनच्या वर असल्याचे समजले जाते. याचे फीचर्स टाटा नेक्सॉनपेक्षा जास्त पॉवरफुल असतील. तसेच या कारची लांबी जवळपास ४ मीटर एवढी असेल. त्यामुळे यात केबिनसाठी चांगली जागादेखील मिळेल.
तसेच या कारचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे यात पूर्ण ब्लॅक थीम मिळेल. टाटा कंपनी ही कार तीन रो सीटिंगसह बाजारात आणणार असल्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त, या कारमध्ये ८.८ इंच टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळेल. त्याला Apple CarPlay आणि Android Auto शी वायरलेसपणे कनेक्ट करता येऊ शकते.
तसेच यामध्ये वायरलेस चार्जर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ आणि लेदर सीट सारखी वैशिष्ट्ये देखील मिळू शकतात. जागेच्या बाबतीत ही कार ह्युंदाई क्रेटापेक्षा चांगली असल्याचे मानले जात आहे. खास तरुणांना लक्षात घेऊन कंपनी ही कार डिझाईन करत आहे.
तसेच यामध्ये ४ किंवा त्याहून अधिक स्पीकर मिळण्याची शक्यता आहे. Blackbird SUV मध्ये डिजिटल इंस्ट्रुमेन्ट कन्सोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ऑटो-डिमिंग IRVM, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ORVM, पॉवर-ऑपरेटेड फ्रंट सीट्स, सीट व्हेंटिलेशन आणि पुश बटण स्टार्ट यासारखी अनेक वैशिष्ट्ये बघायला मिळतील. यासोबतच यामध्ये मोठ्या आकाराचे सनरूफ मिळण्याचीही शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
Virat Kohli : VIDEO : दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए! अहंकारी विराट अखेर सूर्यापुढे झुकला, Video मध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय…
सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; समोर आलेल्या नव्या माहितीने सगळेच हादरले
ज्युस पिल्यामुळे तोंडापासून ते पोटापर्यंत पडले चट्टे; महिलेचा झाला मृत्यू, परिसरात खळबळ
कोरोना काळात नरेंद्र मोदींनी अनेक नवीन औषधांचे शोध लावले; नारायण राणेंचा दावा