टाटा मोटर्सला ग्राहकांची पसंती, वाहन विक्रीत मागील वर्षापेक्षा ३७ टक्क्यांनी वाढ

मुंबई | संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, लॉकडाऊन, या सगळ्यामुळे अर्थव्यवस्थेची घडी पूर्णपणे विस्कटली आहे. याचा फटका अनेक घटकांना बसला आहे.

अशातच टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. याबाबत टाटा मोटर्स यांनी २०२० च्या सप्टेंबर महिन्यातील विक्रीबद्दल माहिती दिली आहे. टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार २०१९ च्या सप्टेंबर महिन्यात ३२,३७६ वाहनांची विक्री झाली होती.

हीच संख्या २०२०च्या सप्टेंबर महिन्यात वाढलेली दिसतं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल ३७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सप्टेंबर महिन्यात टाटा मोटर्स कंपनीने ४४,४४४ गाड्यांची विक्री केली आहे.

दरम्यान, याबाबत टाटा मोटर्सचे प्रवासी वाहनाचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी देखील माहिती दिली. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘देशभरात सर्वत्र कोरोना विषाणूचे संकट वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक संकटांना सामोरे जाऊन पुरवठ्यामध्ये सुधारणा झाली आहे. या वाढलेल्या विक्रीमध्ये आमच्या सर्व ‘न्यु फॉरेव्हर’ रेंजच्या सर्व गाड्यांचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या
संत्रा व मोसंबीच्या नव्या जाती विकसीत; लवकरच येणार बिना बियांच्या संत्रा मोसंबी
म्हणून तीन दिवस रतन टाटा ताज हॉटेलच्या बाहेर पादचारी मार्गावरच थांबले होते
तुम्ही रात्री झोपताना उशाखाली मोबाईल ठेवत असाल तर हे नक्की वाचा, होऊ शकतात गंभीर परिणाम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.