टाटांचा धमाका! फक्त ७९९ रूपयांच्या हप्त्यावर देणार गाडी; जाणून घ्या पुर्ण स्किम..

सणासुदीला आपण नेहमी काहीतरी खरेदी करत असतो. पण दिवाळी दसरा आला की बऱ्याच लोकांना चाहूल लागते ती गाडी घेण्याची. त्यातल्या त्यात बऱ्याच लोकांचे स्वप्न असते कार घेण्याचे, पण आर्थिक अडचण असल्यामुळे ते कार घेत नाहीत. पण तुमचे हेच स्वप्न आता टाटा मोटर्स सत्यात उतरवणार आहेत. टाटा फक्त ७९९ रुपयांच्या EMI वर कार देणार आहेत.

टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांनी ग्राहकांसाठी खास ऑफर सुरू केली आहे. टाटा मोटर्सने कार फक्त ७९९ रुपयांच्या किमान हप्त्यात खरेदी करण्याची ऑफर दिली आहे.

टाटा मोटर्सने एक निवेदन दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की ‘ग्रॅज्युएट स्टेप अप स्कीम’ आणि ‘टीएमएल फ्लेक्सी ड्राइव्ह स्कीम’ या दोन नव्या योजना सुरू केल्या आहेत. या दोन्ही योजना नोव्हेंबर २०२० पर्यंत उपलब्ध होतील.

कंपनीने म्हटले आहे की ‘ग्रॅज्युएट स्टेप अप स्कीम’ अंतर्गत ग्राहक दरमहा किमान ७९९ रुपयांचा हप्ता घेऊ शकतात. तसेच सर्व स्टेट्स, ॐस्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल्स (एसयूव्ही) आणि भारत स्टेज ६ सह सुसंगत विद्युत वाहनांवर याचा लाभ घेता येतो.

तसेच वाहनाच्या मॉडेल आणि आवृत्तीवर ईएमआय अवलंबून असेल. खरेदीदाराच्या सोयीनुसार मासिक हप्ता हळूहळू दोन वर्ष वाढेल. ‘टीएमएल फ्लेक्सी ड्राइव्ह स्कीम’ अंतर्गत ग्राहक दरवर्षी कोणतेही तीन महिने निवडू शकतात ज्यात त्यांना किमान हप्ता भरायचा आहे.

या दोन योजनांतर्गत आपल्या सर्व प्रवासी वाहनांवर एक्स-शोरूम किंमतीच्या १०० टक्के कर्ज देण्याची सुविधा देण्यात येत आहे. कंपनीने सांगितले की या योजना ग्राहकांच्या वाहनांचे हप्ते भरण्यासाठी सहज उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

महिंद्रा अँड महिंद्राबरोबर ट्रॅक्टर्सना कर्ज देण्यासंदर्भात बँक ऑफ बडोदासोबत करार झाला आहे. बीओबी महिंद्रा आणि महिंद्रा ग्राहकांना ५,००० प्लस ग्रामीण आणि अर्ध-शहरी शाखा नेटवर्कद्वारे कर्ज सुविधा प्रदान करेल.

महत्त्वाच्या बातम्या
स्विफ्ट, डिझायर, वॅगनआर मिळवा फक्त दोन लाखांत; मारूती सुझुकी कंपनीने दिला स्वस्त पर्याय
सेकंडहॅंड गाडी घ्यायचा विचार करताय? ‘या‘ गोष्टी चेक केल्या तर फसवणूक नाही होणार
फक्त पेट्रोल वाचतय म्हणून हूरळून जाऊ नका, इलेक्ट्रीक गाडी घ्यायच्या आधी ‘या’ गोष्टीही समजून घ्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.