टाटांशी केलेला वाद आला अंगलट! सायसर मिस्त्रींची कंपनी कर्जात बुडाली, होणार विक्री…

मुंबई । कर्जबाजारी झालेल्या सायरस मिस्त्री यांची कंपनी ४,४०० कोटी रुपयांना विकली जात आहे. रतन टाटांशी घेतलेला पंगा त्यांना चांगलाच अंगलट आला आहे. शापूरजी पालोनजी समूहाची ग्राहक टिकाऊ वस्तूंची प्रमुख कंपनी युरेका फोर्ब्स विकली जाणार आहे. खासगी इक्विटी ग्रुप अॅडव्हेंट इंटरनॅशनलने ते खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे.

या करारासाठी त्याचे एंटरप्राइझ मूल्य ४,४०० कोटी रुपये ठेवण्यात आले आहे. युरेका फोर्ब्स देशातील व्हॅक्यूम क्लीनर आणि वॉटर प्युरिफायर्सच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. या विक्रीमुळे १५४ वर्षांच्या एसपी समूहाचे कर्ज कमी करण्यात आणि त्याच्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यात मदत होईल.

एसपी ग्रुपचा मुख्य व्यवसाय बांधकाम आणि स्थावर मालमत्ता आहे. युरेका फोर्ब्स सध्या तोट्यात चालू आहे. ती सूचीबद्ध मूळ कंपनी फोर्ब्स अँड कंपनी पासून विभक्त केली जाईल आणि नंतर NCLT ची मंजुरी मिळाल्यानंतर BSE वर सूचीबद्ध केली जाईल. यानंतर विक्री होणार आहे.

या कराराला अद्याप नियामक मान्यता मिळालेली नाही. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्समध्ये १८ टक्क्यांहून अधिक सर्वोच्च समभाग असलेल्या एसपी ग्रुपवर सध्या २०,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. फोर्ब्सच्या संचालक मंडळाची रविवारी बैठक झाली यामध्ये विक्रीला मंजुरी देण्यात आली.

युरेका फोर्ब्स खरेदी करण्यासाठी अॅडव्हेंट शर्यतीत आघाडीवर आहे. पालोनजी कुटुंबाने हा व्यवसाय दोन दशकांपूर्वी टाटा समूहाकडून विकत घेतला होता. २०१९ मध्ये, त्याच्या विक्रीची जबाबदारी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला देण्यात आली होती, परंतु कोरोनामुळे ती मध्यंतरी थांबवण्यात आली. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने पुन्हा प्रक्रिया सुरू केली.

शापूरजी पालोनजी समूहाचा टाटा सन्समध्ये १८.३७ टक्के हिस्सा आहे. पलोनजी मिस्त्री यांचा मुलगा सायरस मिस्त्री यांना २०१२ मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. रतन टाटा यांच्या जागी ही निवड करण्यात आली होती. पण अचानक चार वर्षांनंतर त्यांना काढून टाकण्यात आले.

तेव्हापासून त्याचे टाटा समूहाशी मतभेद होते, टाटा समूहाने स्वतः एसपी समूहाचा हिस्सा विकत घेण्याची ऑफर दिली होती, ज्यासाठी मिस्त्री कुटुंब तयार नव्हते. अलीकडेच न्यायालयाने या प्रकरणात टाटांच्या बाजूने निकाल दिला होता. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.