धमाका ऑफर! टाटा आणि महिंद्राच्या ‘या’ गाड्यांवर तब्बल ‘इतक्या’ लाखांचा डिस्काऊंट

मुंबई | कोरोनाच्या मोठ्या संकटानंतर लोकांचे जीवन पुन्हा सुरळीत होत आहे. बाजारपेठांमध्ये वस्तू खरेदीसाठी उत्सुक लोक पाहायला मिळत आहेत. अशात कार कंपन्यांकडून ग्राहकांना खास ऑफर दिल्या जात आहेत.

यावेळी टाटा मोटर्स आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा या नामांकित कंपनीच्या कार्सवर मोठा डिस्काऊंट देण्यात आला आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना घाई करावी लगाणार आहे. कारण ही ऑफर फक्त मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सुरु असेल. याशिवाय कंपनीने ऑफरमध्ये काही निवडकच गाड्यांचा समावेश केला आहे.

टाटा कंपनीने एसूव्ही मार्केटमध्ये आपलं वर्चस्व आणखीन वाढविण्यासाठी नव्या एसयूव्हीची घोषणा केली आहे. कंपनीने या नव्या कारला हॅरियर नाव दिले आहे. या कारवर एकूण ७० हजार रुपयांचा डिस्काऊंट देण्यात आला आहे.

Mahindra Alturas G4  या महिंद्राच्या कारवर जबरदस्त डिस्काऊंट दिला जात आहे. या कारवर ३.०२ लाख रुपयांचा बंपर डिस्काऊंट दिला जात आहे. या डिस्काऊंटमध्ये २.२ लाख रुपयांच्या कॅश डिस्काऊंटचा समावेश आहे.

महिंद्रा ची लोकप्रिय कार  Mahindra XUV 500 या कारवर ८० हजारांपेक्षा डास्त रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट ऑफर केला आहे. यामध्ये तब्बल ३६ हजार रुपयांच्या कॅश डिस्काऊंटचा समावेश आहे.

याशिवाय टाटाची दमदार कार टाटा नेक्सॉनच्या डिझेल इंजिन मॉडेलवर २० हजारांचा डिस्काऊंट देण्यात आला आहे. तर टाटा नेक्सॉनच्या इतर मॉडेल्सवर १५ ते १० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या
मारुती सुझुकी लवकरच बाजारात आणणार नवीन इलेक्ट्रिक OMNI, किंमत असेल फक्त…
अवघ्या सहा लाखांत टाटाची ‘ही’ शानदार SUV कार, वाचा काय आहेत फीचर्स
जुनी पेट्रोल बाईक बनली इलेक्ट्रिक बाईक, पट्रोलचा खर्च टाळण्यासाठी ‘हे’ भन्नाट जुगाड लोकप्रिय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.